शिवराजच्या दोघांची विभागीय कुस्ती स्पधेर्साठी निवड !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 06:54 PM2017-09-20T18:54:21+5:302017-09-20T18:54:26+5:30
मुरगूड : येथील शिवराज विदयालय व ज्युनियर कॉंलेजच्या दोन कुस्तीगीरांची फलटण येथे होणा?्
मुरगूड : येथील शिवराज विदयालय व ज्युनियर कॉंलेजच्या दोन कुस्तीगीरांची फलटण येथे होणा?्या विभागीय कुस्ती स्पधेर्साठी निवड झाली आहे .कोल्हापूर येथे मोतीबाग तालमी मध्ये कोल्हापूर जिल्हास्तरीय शासकीय शालेय कुस्ती स्पर्धा झाल्या . या स्पर्धत जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित शिवराज विदयालय व ज्युनियर कॉलेजच्या सुशांत साहेबराव पालवे याने १९ वषार्खालील ७४ किलो वजन गटात ग्रीको रोमन कुस्ती प्रकारात अजिंक्यपद पटकावले, तर पृथ्वीराज अर्जुन पाटील याने १७ वषार्खालील गटात ७६ किलो वजन गटात फ्री स्टाईल कुस्तीप्रकारात अजिंक्यपद पटकावले . या दोघांची फलटण ( सातारा ) येथे होणा?्या विभागीय कुस्ती स्पधेर्साठी निवड झाली आहे .
विजयी झालेले मल्ल येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुलात ( साई आखाडा ) एनआयएस कोच दादासाहेब लवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत . त्याना संस्थेचे सेक्रेटरी प्रा . संजयदादा मंडलिक, संचालक वीरेंद्र मंडलिक, कार्यवाह आणासाहेब थोरवत, प्राचार्य महादेव कानकेकर, उपप्राचार्य एस .एस. पाटील, क्रीडा शिक्षक प्रा . रवींद्र शिंदे यांचे प्रोत्साहन लाभले .