शिवसेनेचा काँग्रेसच्या हातात हात! कोल्हापूर महापौर निवड : चार मते काँग्रेस आघाडीला, संख्याबळ ४४ वरून झाले ४८; विरोधकांची धार बोथट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 11:16 PM2017-12-22T23:16:51+5:302017-12-22T23:22:45+5:30

कोल्हापूर : कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या स्वाती सागर यवलुजे, तर उपमहापौरपदी राष्टÑवादीच्या सुनील सावजी पाटील यांच्या निवडीवर महापालिका सभागृहाने शुक्रवारी बहुमताची मोहोर उमटवली.

Shivsena's hand in Congress hands! The choice of mayor of Kolhapur: Four votes have been won by Congress; Opponent's torrent blunt | शिवसेनेचा काँग्रेसच्या हातात हात! कोल्हापूर महापौर निवड : चार मते काँग्रेस आघाडीला, संख्याबळ ४४ वरून झाले ४८; विरोधकांची धार बोथट

शिवसेनेचा काँग्रेसच्या हातात हात! कोल्हापूर महापौर निवड : चार मते काँग्रेस आघाडीला, संख्याबळ ४४ वरून झाले ४८; विरोधकांची धार बोथट

Next
ठळक मुद्देआपल्या मुलाने उपमहापौर व्हावे अशी सावजी पाटील यांची इच्छा होती. निवड होताच सुनील पाटील वडिलांचे पाय धरले व आशीर्वाद घेतले.- महापौरपदी निवड झाल्यानंतर स्वाती यवलुजे यांचे सभागृहात त्यांचे अभिनंदन त्यांच्या पृथ्वीराज या सहा वर्षाच्या मुलाने गुलाल लावून केले.

कोल्हापूर : कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या स्वाती सागर यवलुजे, तर उपमहापौरपदी राष्टÑवादीच्या सुनील सावजी पाटील यांच्या निवडीवर महापालिका सभागृहाने शुक्रवारी बहुमताची मोहोर उमटवली. ही निवड अपेक्षित असली तरी शिवसेनेची चार मतेही काँग्रेस-राष्टÑवादीने मिळवून विरोधकांची ताकद कमकुवत केली.

सभागृहातील संख्याबळ पाहता भाजप-ताराराणी आघाडीच्या नेत्यांनी या निवडणुकीत फारसा उत्साह दाखविला नाही किंवा चमत्काराची भाषाही केली नाही. त्यामुळे काँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेस बाजी मारणार, हे स्पष्ट झाले होते. शिवसेनेमुळे त्यांचे संख्याबळ ४४ वरून ४८ पर्यंत पोहोचले. राज्यात सरकारमध्ये एकत्र असले तरी त्यांच्यात फारसे सख्य नसल्याने भाजपच्या नादाला न लागता कोल्हापूर महानगरपालिकेत कॉँग्रेस - राष्टÑवादीशी हातमिळवणी करून ‘परिवहन’चे सभापतिपद पदरात पाडून घेतले. नूतन पदाधिकाºयांची निवड होताच पिठासन अधिकारी कुणाल खेमनार, महापालिका आयुक्त अभिजित चौधरी, मावळत्या महापौर हसिना फरास यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. स्वाती यवलुजे या कोल्हापूरच्या ४५ व्या महापौर, तर सुनील पाटील ४२ वे उपमहापौर आहेत.
शिवसेनेच्या नगरसेवकांची चुळबुळ

शिवसेनेचे चार नगरसेवक सभागृहात आहेत. त्यांच्या पाठिंब्यामुळे काँग्रेसचे मताधिक्य १५ ने वाढणार होते. त्यामुळे त्यांचा पाठिंबा मिळावा म्हणून कॉँग्रेसने गेल्या स्थायी सभापती निवडीवेळी त्यांच्याशी काही तडजोडी केल्या आहेत.
परिवहन सभापतिपद त्यांना देण्यात येणार आहे तरीही त्यांची सभागृहातील चुळबुळ लक्षवेधी होती. सभागृहात आल्यावर नियाज खान, राहुल चव्हाण, अभिजित चव्हाण हे तर विरोधी आघाडीच्या बाकावर बसले होते. प्रा. जयंत पाटील यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांना काँग्रेस आघाडीच्या बाजूला बसण्याची व्यवस्था केली. त्यानंतरही या तिघांशी जयंत पाटील, शारंगधर देशमुख बराच वेळ बोलतना दिसत होते. महापौरपदासाठी स्वाती यवलुजे यांनी मतदान करताना तर त्यांनी सर्वांत शेवटी हात वर केले. उपमहापौरपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पंधरा मिनिटे माघारीची मुदत देण्यात आली. या मुदतीत तिघेही बाहेर गेले शेवटी त्यांना बोलावून घेण्यात आले. त्यांची ही चुळबुळ बरेच काही सांगून जात होती.

हसिना फरास यांची तब्बेत बिघडली
मावळत्या महापौर हसिना फरास यांची तब्बेत गुरुवापासून बिघडली होती. डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात अ‍ॅडमिट होण्याचा सल्लाही दिला होता; पण महापौरपदाची निवडणूक असल्याने त्या अ‍ॅडमिट झाल्या नाहीत. शुक्रवारी सकाळी त्या मिरवणुकीने महापालिकेत आल्या खºया पण त्यांना चक्कर येऊ लागल्याने हाताला धरून सभागृहात नेण्यात आले. सभागृहात संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडेपर्यंत त्या डोळे झाकूनच आसनावर बसून राहिल्या. सभागृहात डॉ. अमोलकुमार माने यांनी त्यांची तपासणी तसेच रक्तदाब पाहिला. नूतन पदाधिकाºयांचे अभिनंदन करून त्या लगेच निघून गेल्या.
 

. क्षणचित्रे -
- कॉँग्रेस-राष्टÑवादीचे सर्व नगरसेवक मिरवणुकीने महापालिकेत दाखल झाले. त्यांच्यासोबत मोटारसायकलस्वारांचा मोठा ताफा होता.
- स्वाती यवलुजे यांचे पती सागर, सासू हिराबाई यांच्यासह सर्वच नातेवाईक जाम खूश होते.
- नूतन पदाधिकाºयांचे नातेवाईक मोठ्या संख्येने महापालिकेत उपस्थित होते


केबल आॅपरेटर ‘सोन्या’ झाला उपमहापौर
नूतन उपमहापौर सुनील पाटील हे सर्वसामान्य कुटुंबातील असून एकेकाळचे केबल आॅपरेटर होते. मूळचे शिवसैनिक असलेले जाधव यांना आजही त्यांचे मित्र ‘सोन्या’ म्हणूनच हाक मारतात. शिवसेनेने त्यांना उमेदवारी नाकारली म्हणून राष्टÑवादीकडून निवडणूक लढवली. सन २०१०च्या निवडणुकीत ते प्रथम महापालिकेवर निवडून गेले. त्यानंतर २०१५ च्या निवडणुकीत पुन्हा राष्टÑवादीच्या तिकिटावर दुसºयांदा विजय मिळविला. गेली दोन वर्षे ते पक्षाचे गटनेते म्हणून काम पाहत होते. उपमहापौर होण्याची त्यांची इच्छा शुक्रवारी पूर्ण झाली.

थेट पाईपलाईनच्या कामाला गती देणार : स्वाती यवलुजे
कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचे काम रेंगाळले असून आपल्या कारकिर्दीत या कामास गती देण्यावर अधिक भर राहील, असे नूतन महापौर स्वाती यवलुजे यांनी शुक्रवारी बोलताना सांगितले.
झूम प्रकल्पावरील कचºयाचे ढीग वाढले असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे तेथील सर्व कचरा उठावाचे तातडीने नियोजन केले जाईल. कचºयावर वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्पासाठी प्रयत्न केले जातील. महापालिका अधिकारी व रोकेम यांचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन सूचना दिल्या जातील. एसटीपी प्रकल्प लवकरात लवकर कसा सुरू होईल हे सुद्धा पाहिले जाईल , असे महापौर यवलुजे यांनी सांगीतले.

सर्वसामान्य गृहिणी ते महापौर
सागर यवलुजे हे आमदार सतेज पाटील यांचे स्वीय सहाय्यक आहेत. दोनवेळा त्यांनी महापालिकेची निवडणूक लढविली, पण यशाने हुलकावणी दिली. एक सर्वसामान्य गृहिणी असलेल्या स्वाती यांना त्यांनी सन २०१५ च्या निवडणुकीत उभे केले आणि त्या प्रभाग क्रमांक ६ पोलीस लाईन येथून निवडून आल्या. स्वाती यांचे शिक्षण बारावी आर्टस्पर्यंत झाले आहे. त्यांचे माहेर बत्तीस शिराळा असून वडील एस. टी. कंडक्टर आहेत. सासरे सहायक फौजदार होते. कुकिंग आणि वाचन हा स्वातींचा आवडीचा छंद आहे. अवघ्या दोन वर्षांत त्यांना महापौर होण्याचा बहुमान मिळाला

पन्हाळ्याहून जल्लोषात आगमन
काँग्रेस-राष्टÑवादीचे सर्व नगरसेवक चार दिवस गोव्याच्या सहलीवर होते. त्यानंतर गुरुवारी रात्री ते पन्हाळ्यावर पोहोचले. शुक्रवारी सकाळी अकरा वाजता निवडणूक आहे म्हटल्यावर सकाळी नऊ वाजता आमदार सतेज पाटील यांच्या ‘अजिंक्यतारा’ कार्यालयावर गेले. त्याठिकाणी महापौर-उपमहापौरपदाच्या उमेदवारांना तिरंगी फेटे बांधण्यात आले, तर अन्य सर्व नगरसेवकांना जरीचे भगवे फेटे बांधण्यात आले तसेच पक्षाचे तिरंगी स्कार्प घालण्यात आले. सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी सर्व नगरसेवक खासगी लक्झरी बसने तसेच चारचाकी मोटारीतून महापालिका चौकात पोहोचले. स्वाती यवलुजे, सुनील पाटील, माजी महापौर हसिना फरास, स्थायी सभापती संदीप नेजदार यांची मोटार सर्वांत पुढे होती. यवलुजे व पाटील यांनी महापालिकेतील मंदिरात दर्शन घेतले आणि लगेचच सभागृह गाठले.

वेळेवर कामकाज सुरू
एरव्ही महानगरपालिकेची सभा अकरा वाजता असली तरी ती दुपारी एक वाजेपर्यंत सुरू होत नाही; परंतु शुक्रवारी महापौर-उपमहापौर निवडीची सभा असल्याचे सकाळी १० वाजून ५० मिनिटांनी नगरसेवकांच्या उपस्थितीने सभागृह फुल्ल झाले. त्यातही उपमहापौरपदाचे उमेदवार कमलाकर भोपळे, उमा इंगळे सकाळी ११ वाजून ०८ मिनिटांनी सभागृहात पोहोचले. नगरसचिव दिवाकर कारंडे यांनी कामकाज सुरू करताच खालून सुनील कदम यांनी ‘प्रत्येक सभेचे कामकाज असेच वेळेवर सुरू करत जा’ असा सल्ला दिला.

...अन् त्यांची नाराजी लपली नाही
महापौरपदासाठी उमा बनछोडे व दीपा मगदूम याही इच्छुक होत्या. बनछोडे यांनी तर महापौर म्हणून आपल्यालाच संधी मिळणार याची खात्री होती; परंतु दोघींचाही भ्रमनिरास झाला. त्यांना डावलून स्वाती यवलुजे यांना संधी देण्यात आली. त्यामुळे बनछोडे व मगदूम कमालीच्या नाराज झाल्या. त्यांची ही नाराजी सभागृहातही स्पष्टपणे दिसून आली. दोघीही अजिंक्यतारा येथून फेटे बांधून आल्या, पण महापौरपदाची निवडणूक पार पडताच त्यांनी फेटे काढले. त्या सभागृहात एकत्र बसल्या होत्या पण त्यांनी कोणाशी संवाद केला नाही. त्यांचा हा ‘अबोला’ नाराजी सांगून केला.

विरोधी नगरसेवक परस्पर पोहोचले
विरोधी आघाडीच्या सर्व नगरसेवकांना परस्पर महानगरपालिकेत येण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार सकाळी साडेदहा वाजल्यापासून त्यांच्या गटाचे नगरसेवक येत राहिले. भाजप गटनेते विजय सूर्यवंशी व ताराराणीचे गटनेते सत्यजित कदम, विरोधी पक्षतेते किरण शिराळे यांच्या नेतृत्वाखाली सर्व नगरसेवक सकाळी साडेदहा वाजताच पोहोचले होते. या आघाडीच्या नगरसेवकांमध्ये कसलाही उत्साह पाहायला मिळाला नाही.


 

Web Title: Shivsena's hand in Congress hands! The choice of mayor of Kolhapur: Four votes have been won by Congress; Opponent's torrent blunt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.