करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरातील किरणोत्सवाच्या अभ्यासासाठी विशेष समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 02:27 AM2017-11-01T02:27:36+5:302017-11-01T02:27:51+5:30
करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या किरणोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत तयार झालेल्या मानवनिर्मित अडथळ्यांमुळे किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होत नाही.
कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या किरणोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत तयार झालेल्या मानवनिर्मित अडथळ्यांमुळे किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होत नाही. त्यामुळे येत्या आठ तारखेपासून सुरू होणा-या किरणोत्सवापूर्वी शक्य तितके अडथळे दूर करण्यात येणार आहेत, अशी माहिती अध्यक्ष महेश जाधव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. किरणोत्सवाचा अभ्यास करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
जाधव म्हणाले, यापूर्वी ‘केआयटी’चे प्रा. किशोर हिरासकर, विवेकानंद महाविद्यालयाचे मिलिंद कारंजकर यांच्यासह विविध अभ्यासकांनी किरणोत्सवात येणा-या अडथळ्यांचा अभ्यास केला आहे. किरणोत्सवासाठी महाद्वार ते संध्यामठ आणि रंकाळ्याचा पुढील काही भाग ‘नो डेव्हलपमेंट झोन’ म्हणून जाहीर करावा लागणार आहे. त्याचा डिजिटल नकाशाच्या आधारे अभ्यास करण्यासाठी अभ्यास समिती स्थापन करण्यात आली आहे.