राज्य नाट्य स्पर्धेचा कोल्हापुरातील पडदा ६ नोव्हेंबरला उघडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 05:49 PM2017-10-25T17:49:41+5:302017-10-25T17:55:16+5:30
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या कोल्हापूर केंद्रातील प्राथमिक फेरीला ६ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे सायंकाळी सात वाजता नाट्यप्रयोग होतील.
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या कोल्हापूर केंद्रातील प्राथमिक फेरीला ६ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे सायंकाळी सात वाजता नाट्यप्रयोग होतील.
एकूण १८ नाट्यप्रयोग पाहण्याची पर्वणी रसिकांना मिळणार आहे. यशोधरा पंचशील थिएटर अकॅडमीचे कलाकार पु. ल. देशपांडे लिखित ‘वटवट वटवट’ या नाटकाने स्पर्धेचा पडदा उघडणार आहेत.
गेल्यावर्षी सीमाभागातील काही संस्था सहभागी झाल्या होत्या. यंदाही बेळगाव येथील दोन संस्थांचा स्पर्धेतील सहभाग वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. यामध्ये अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेची बेळगाव शाखा आणि सरस्वती वाचनालय यांचा समावेश आहे.
कोल्हापुरातील हौशी नाट्यपरंपरा जपणारी अभिरुची नाट्यसंस्था आणि गायन समाज देवल क्लबही स्पर्धेत सहभागी होत आहेत. हिमांशू स्मार्त, विद्यासागर अध्यापक या कोल्हापुरातील लेखकांच्या नाट्यकृती यंदा सादर होणार आहेत. तसेच ग्रामीण भागातूनही यावर्षी नाट्यसंस्थांचा सहभाग उल्लेखनीय आहे.
दिनांक संस्था नाटकाचे नाव
६ नोव्हेंबर यशोधरा थिएटर वटवट वटवट
७ नोव्हेंबर सुगुण नाट्यकला संस्था, कोल्हापूर अग्निपंख
८ नोव्हेंबर तुकाराम माळी तालीम मंडळ, कोल्हापूर वाटले होते काही मैल
९ नोव्हेंबर सरस्वती वाचनालय, बेळगाव पेलटियर
१० नोव्हेंबर साई नाट्यधारा मंडळ, चंदगड के ५
११ नोव्हेंबर शिवम नाट्य संस्था, कोल्हापूर प्रश्न मनाच्या पटलावर
१२ नोव्हेंबर शाहिरी पोवाडा कलामंच, कोल्हापूर सूर्यास्त
१३ नोव्हेंबर संघर्ष बहुउद्देशीय सेवा संस्था, जयसिंगपूर इथे ओशाळला मृत्यू
१४ नोव्हेंबर रूद्रांश अकॅडमी, कोल्हापूर बिलिव्ह इन
१५ नोव्हेंबर रंगयात्रा नाट्य संस्था, इचलकरंजी द कॉन्शन्स
१६ नोव्हेंबर प्रज्ञान कला अकादमी, वारणानगर दलदल
१७ नोव्हेंबर फिनिक्स क्रिएशन, कोल्हापूर शांतता कोर्ट चालू आहे
१८ नोव्हेंबर पदन्यास कला अकादमी, इचलकरंजी इथॉस
१९ नोव्हेंबर निष्पाप कलानिकेतन, इचलकरंजी नथिंग टू से
२० नोव्हेंबर गायन समाज देवल क्लब, कोल्हापूर नवी विटी दांडू
२१ नोव्हेंबर भालजी पेंढारकर कलादालन, कोल्हापूर हयवदन
२२ नोव्हेंबर मराठी नाट्य परिषद, बेळगाव शाखा एक शून्य सीमारेषा
२३ नोव्हेंबर अभिरूची नाट्य संस्था, कोल्हापूर यकृत