राज्यस्तरीय भूलशास्त्र परिषद शनिवारी
By admin | Published: February 4, 2015 11:46 PM2015-02-04T23:46:31+5:302015-02-04T23:58:33+5:30
तज्ज्ञ होणार सहभागी : कदमवाडील डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये आयोजन
कोल्हापूर : भूलशास्त्राविषयीची राज्यस्तरीय परिषद शनिवारी व रविवारी ((दि. ७ व ८) कोल्हापुरातील कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज येथे आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेमध्ये राज्यभरातील अडीचशेहून अधिक तज्ज्ञ सहभागी होणार असून, त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ या शास्त्रामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे, अशी माहिती भारतीय भूलशास्त्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. शीतल देसाई यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. देसाई म्हणाले, दुपारी १२.३० वाजता उद्घाटन डी. वाय. पाटील शिक्षण समूहाचे अध्यक्ष संजय डी. पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. एस. एच. पवार उपस्थित राहणार आहेत. यावेळी डॉ. पुष्पा अगरवाल, डॉ. साधना कुलकर्णी, डॉ. विकास कुरेकर, डॉ. प्रज्ञा सावंत, डॉ. बी. डी. बांदे, डॉ. विजया पाटील, डॉ. माधवी सेठ-महाजन, डॉ. सतीश देशपांडे, डॉ. इस्माईल नमाजे, डॉ. सफिया शेख, डॉ. मंजुनाथ पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. भूलशास्त्रामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्याऱ्या विद्यार्थ्यांचे ज्ञान सखोल व्हावे, या शास्त्रातील अंगे त्यांना ज्ञात व्हावीत, प्रत्यक्ष भूलेवेळी निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीच्या परिस्थिती, त्यांतून बाहेर येण्याचे मार्ग व भूलविषयक कौशल्यासोबत विविध उपकरणांची माहिती व्हावी, हे या परिषदेचे उद्दिष्ट आहे. यामध्ये व्याख्यानापेक्षा रुग्णविषयक सादरीकरण व चर्चासत्रातून ज्ञान देण्याचा प्रयत्न असणार आहे. पुस्तकी ज्ञानासोबत त्याचा प्रात्यक्षिकात वापर कसा होईल, हे सांगण्यात येईल. ही परिषद यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. एस. एस. हारसूर, राज्याध्यक्ष डॉ. अशोक देशपांडे, सचिव डॉ. मिलिंद पोळ, माजी अध्यक्ष शकील मोमीन, दिलीप परांजपे, महाराष्ट्र राज्य गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. आबासाहेब शिर्के, परिषद अध्यक्ष डॉ. इस्माईल नमाजे, उपाध्यक्ष डॉ. कल्पना कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. यावेळी डॉ. दिलीप देसाई, डॉ. किरण भिंगार्डे, डॉ. शकील मोमीन उपस्थित होते.