कोल्हापुरात २६ पासून मुख्याध्यापक संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 06:32 PM2017-10-17T18:32:43+5:302017-10-17T18:41:10+5:30

  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन कोल्हापुरात दि. २६ ते २८ आॅक्टोबरदरम्यान होणार आहे. येथील शिवाजी पेठेतील महाराष्ट्र हायस्कूलच्या क्रीडांगणावर होणाºया या अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

State level seminar of the Headmaster's team from Kolhapur, 26 | कोल्हापुरात २६ पासून मुख्याध्यापक संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन

कोल्हापुरात २६ पासून मुख्याध्यापक संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनशिक्षणक्षेत्रातील विविध विषयांवर होणार विचारमंथन

 कोल्हापूर , दि. १७ :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन कोल्हापुरात दि. २६ ते २८ आॅक्टोबरदरम्यान होणार आहे. येथील शिवाजी पेठेतील महाराष्ट्र हायस्कूलच्या क्रीडांगणावर होणाऱ्या  या अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

अधिवेशनाच्या अध्यक्षपदी ठाणे जिल्ह्यातील भातसानगर प्रकल्प विद्यालयाचे मुख्याध्यापक संदिपान मस्तूद आहेत, अशी माहिती ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष डी. बी. पाटील आणि कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव आर. वाय. पाटील यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.


स्वागताध्यक्ष डी. बी. पाटील म्हणाले, राज्य संघ आणि कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघातर्फे आयोजित या अधिवेशनाचे उद्घाटन गुरुवारी (दि. २६) दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. यावेळी अधिवेशनाचे चीफ पेट्रन शाहू छत्रपती, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत, आदी प्रमुख उपस्थित असणार आहेत. यादिवशी सकाळी अकरा वाजता संघाची कौन्सिल कमिटीची बैठक होईल. त्यात विविध ठराव केले जाणार आहेत. शनिवारी (दि. २८) सकाळी साडेदहा वाजता ‘राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार’ वितरण होणार आहे.

सचिव आर. वाय. पाटील म्हणाले, अधिवेशनाच्या उद्घाटनादिवशी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, शाहीर आझाद नायकवडी यांचे ‘लेणं महाराष्ट्राचं!’ हा कार्यक्रम होणार आहे. अधिवेशनात शिक्षणक्षेत्रातील विविध विषयांवर विचारमंथन होणार आहे. त्यासह ग्रंथ, शैक्षणिक साहित्य प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेला मोहन थोरात, सुभाष माने, आदिनाथ थोरात, विजयसिंह गायकवाड, व्ही. जी. पोवार, डी. एस. घुगरे, आर. डी. पाटील, सी. एम. गायकवाड, के. के. पाटील, आदी उपस्थित होते.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन

अधिवेशनातील विविध सत्रांत भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे, आनंद मेणसे, सागर देशपांडे, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे, शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी, मुख्याध्यापक संघाच्या महामंडळाचे माजी अध्यक्ष सुभाष माने, रेवती नामजोशी, पुष्पलता पवार, शकुंतला काळे, नामदेवराव जरग, किरण लोहार, यजुर्वेद महाजन, देवदत्त राजोपाध्ये आदी तज्ज्ञ, अभ्यासक मार्गदर्शन करणार आहेत.

अधिवेशनातील चर्चासत्रे, व्याख्याने

*शुक्रवारी (दि. २७) : सकाळी ९. ३० वाजता - नवीन शैक्षणिक धोरण २०१६
: सकाळी ११ वाजता - तंत्रज्ञानयुक्त शिक्षणाच्या दिशेने
: दुपारी ३ वाजता - शिक्षक, मुख्याध्यापकांसाठी नवे शैक्षणिक प्रयोग
: दुपारी ४. ३० वाजता-बदलत्या शिक्षणातील मुख्याध्यापकांची भूमिका यावर व्याख्यान
* शनिवारी (दि. २८) : सकाळी ९. ३० वाजता- शिक्षणव्यवस्थेतील मुख्याध्यापकांची भूमिका

 

 

Web Title: State level seminar of the Headmaster's team from Kolhapur, 26

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.