कोल्हापुरात शनिवारपासून ‘स्ट्रॉबेरी-मध महोत्सव’, सातारा जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 08:01 PM2018-02-07T20:01:04+5:302018-02-07T20:05:06+5:30
साऱ्या जगाला भुरळ घालणाऱ्या महाबळेश्वर स्ट्रॉबेरी व मधाची चव आता कोल्हापूरकरांना चाखावयास मिळणार आहे. जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या सभागृहात शनिवार (दि. १०) पासून चार दिवस स्ट्रॉबेरी व मध महोत्सवाचे आयोजन केल्याची माहिती सातारा जिल्हा उपनिबंधक डॉ. महेश कदम यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर : साऱ्या जगाला भुरळ घालणाऱ्या महाबळेश्वर स्ट्रॉबेरी व मधाची चव आता कोल्हापूरकरांना चाखावयास मिळणार आहे. जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या सभागृहात शनिवार (दि. १०) पासून चार दिवस स्ट्रॉबेरी व मध महोत्सवाचे आयोजन केल्याची माहिती सातारा जिल्हा उपनिबंधक डॉ. महेश कदम यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
अनेक ठिकाणी स्ट्रॉबेरी व मधाचे उत्पादन होते; पण महाबळेश्वरच्या या उत्पादनाला वेगळीच चव व गोडी आहे. महाबळेश्वर मधोत्पादक सोसायटीअंतर्गत १६०० सभासद मधाचे उत्पादन करतात.
जांभूळ मध, गेळा मध, हिरडा मध, कारवी मथ, अकरा मध व व्हायटी मध अशी अनेक प्रकारची उत्पादने घेतली जातात. मधापासून वेगवेगळी उत्पादने घेतली आहेत.
विविध वजनांतील स्ट्रॉबेरीची पॅकिंग प्रदर्शनात ठेवली जाणार आहेत. कोल्हापूरच्या लोकांना अस्सल स्ट्रॉबेरीचा आस्वाद घेता यावा, यासाठी प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आयोजन केल्याचे डॉ. कदम यांनी सांगितले.
शनिवारी दुपारी चार वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते महोत्सवास प्रारंभ होणार आहे. १३ फेबु्रवारीपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार असून, नागरिकांनी महोत्सवास भेट द्यावी, असे आवाहन डॉ. कदम यांनी केले आहे.
यावेळी महाबळेश्वर मधोत्पादक सोसायटीचे अध्यक्ष संजय गायकवाड, श्रीराम फळ प्रक्रिया संस्था, भिलारचे अध्यक्ष दत्तात्रय पार्टे, नितीन भिलारी, बाजार समितीचे सचिव मोहन सालपे, आदी उपस्थित होते.
महोत्सवाचे आकर्षण
नाबिला प्लॉबिया व कामारोजा स्ट्रॉबेरी, हनी वुईथ स्ट्रॉबेरी जॅम, हनी वुईथ जांभूळ जॅम, हनी वुईथ अॅल्युवेरा ज्यूस, कॅडबरी वुईथ हनी चॉकलेट्स, अॅँटिबायोटिक्स फ्री फॉरेस्ट मध.