कोल्हापूरच्या त्या विद्यार्थींनीची विनोद तावडेंनी केईएममध्ये जाऊन घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2017 02:29 PM2017-12-16T14:29:29+5:302017-12-16T14:29:42+5:30

गृहपाठ केला नाही म्हणून ५०० उठाबशा काढणारी विद्यार्थीनी विजया निवृत्ती चौगुले हिची आज केईएम रुग्णालयात जाऊन शिक्षण मंत्री श्री.विनोद तावडे यांनी भेट घेतली.

Student of Kolhapur went to the KEM and visited Vinod Tawwardeni | कोल्हापूरच्या त्या विद्यार्थींनीची विनोद तावडेंनी केईएममध्ये जाऊन घेतली भेट

कोल्हापूरच्या त्या विद्यार्थींनीची विनोद तावडेंनी केईएममध्ये जाऊन घेतली भेट

Next

मुंबई - गृहपाठ केला नाही म्हणून ५०० उठाबशा काढणारी विद्यार्थीनी विजया निवृत्ती चौगुले हिची आज केईएम रुग्णालयात जाऊन शिक्षण मंत्री श्री.विनोद तावडे यांनी भेट घेतली. विजयाच्या प्रकृतीची चौकशी केली व तिला हिम्मत दिली.  तिच्यावर उपचार करणारे न्यूरॉलॉजिस्ट डॉ.रावत आणि डॉ.प्रविण बांगर यांच्याकडून तिच्या उपचाराची माहिती घेतली.

तिची भेट घेतल्यानंतर प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना श्री.विनोद तावडे यांनी सांगितले की, तिच्यावरील उपचारावर तिचे कुटुंबिय समाधानी आहेत. विजया लवकरच पूर्णपणे बरी होऊन पुन्हा कोल्हापूरच्या शाळेत जाऊ शकेल. पण विजयाची पुन्हा त्याच शाळेत जाण्याची मानिसकता नसेल तर तिला तेथून जवळच्या दुस-या शाळेत प्रवेश देण्यात येईल. विजयाच्या पाठीशी सरकार पूर्णपणे पाठीशी उभे आहे.विजयाच्या उपचारावरील पूर्ण खर्च मोफत करण्यात येईल, असेही श्री. तावडे यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना सांगितले. 

तसेच विजयाचे वडील त्याच शाळेत शिपाई पदावर नोकरीला असून त्यांना त्या शाळेत नोकरी करायची नसेल तर त्यांना बाजूच्या शाळेत समायोजित केले जाईल असेही श्री. तावडे यांनी सांगितले. कोल्हापूरमधील चंदगड तालुक्यातील कानूर बुद्रुक या भावेश्वरी संदेश विदयालयातील  इयत्ता आठवीत शिकणा-या विजया चौगुले ही विद्यार्थ्यीनी शिकत आहे. उठाबशाची शिक्षा दिल्यानंतर त्या विद्यार्थ्यीनीची प्रकृती बिघडली. 

त्यानंतर तिला कोल्हापूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. काल तिला कोल्हापूरहून मुंबईच्या केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उठाबशाची शिक्षा देणा-या शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी देवणला पोलिसांनी अटक केली आहे.

Web Title: Student of Kolhapur went to the KEM and visited Vinod Tawwardeni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.