कोल्हापुरात ‘किफ’चा आजपासून प्रारंभ सुभाष घई उद्घाटक : सुमित्रा भावे यांना पुरस्काराचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 01:10 AM2017-12-14T01:10:04+5:302017-12-14T01:12:41+5:30

कोल्हापूर : सहाव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास आज, गुरुवारपासून सुरुवात होत आहे. शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी ५.३० वाजता होणाºया उद्घाटन समारंभात कलामहर्षी बाबूराव पेंटर पुरस्कार

Subhash Ghai inaugurator: Sumitra Bhave gets the award for 'Kip' from Kolhapur | कोल्हापुरात ‘किफ’चा आजपासून प्रारंभ सुभाष घई उद्घाटक : सुमित्रा भावे यांना पुरस्काराचे वितरण

कोल्हापुरात ‘किफ’चा आजपासून प्रारंभ सुभाष घई उद्घाटक : सुमित्रा भावे यांना पुरस्काराचे वितरण

googlenewsNext
ठळक मुद्देकोल्हापूर वस्तुसंग्रहालयाने ही दुर्मीळ छायाचित्रे या प्रदर्शनासाठी उपलब्ध करून दिली भारतीय चित्रपट महामंडळामार्फत या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोल्हापुरात

कोल्हापूर : सहाव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास आज, गुरुवारपासून सुरुवात होत आहे. शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी ५.३० वाजता होणाºया उद्घाटन समारंभात कलामहर्षी बाबूराव पेंटर पुरस्कार लेखिका, दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांना प्रदान करण्यात येणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक सुभाष घई यांच्या हस्ते होणार आहे.
दि. १४ डिसेंबर ते २१ डिसेंबरदरम्यान शाहू स्मारक भवनातील तीन चित्रगृहांत देश-विदेशातील विविध ७० चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.प्रतिवर्षीप्रमाणे कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळामार्फत या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोल्हापुरात घेण्यात येणार आहे. यंदा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारप्राप्त ‘कासव’ या चित्रपटाच्या लेखिका-दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांना उद्घाटक सुभाष घई यांच्या हस्ते कलामहर्षी बाबूराव पेंटर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी, संयोजक दिलीप बापट, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघनाथ राजेभोसले, सचिव रणजित जाधव, संचालक सतीश बिडकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाचे आज उद्घाटन
भारतीय चित्रपट व्यवसायाच्या शतकपूर्तीनिमित्त प्रथमच कोल्हापूर वस्तुसंग्रहालयाच्या सहकार्याने महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या चित्रपटांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविले जाणार आहे. त्याचे उद्घाटन सायंकाळी सुभाष घई यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी वस्तुसंग्रहालयाचे सहायक अभिरक्षक अमृत पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कोल्हापूर वस्तुसंग्रहालयाने ही दुर्मीळ छायाचित्रे या प्रदर्शनासाठी उपलब्ध करून दिली आहेत. कोल्हापूर चित्रपट निर्मितीतील महत्त्वाचे योगदान देणाºया व्यक्तींच्या नामफलकांचे शोधन संकलन भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्राच्या शोध विभागाद्वारे उपलब्ध झाले आहेत.

Web Title: Subhash Ghai inaugurator: Sumitra Bhave gets the award for 'Kip' from Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.