वीर शिवा काशिद अभिनय पुरस्काराने विजय पोवार, सागर चौघुले यांचा मरणोत्तर सन्मान

By admin | Published: April 13, 2017 03:21 PM2017-04-13T15:21:58+5:302017-04-13T15:21:58+5:30

प्रज्ञानने घडवला विवेकाचा जागर : वारणानगरमध्ये रंगला दृश्यकलांचा महोत्सव

Veer Shiva Kashyad Award for Best Actor award by Vijay Powar, Sagar Choughule's posthumous honor | वीर शिवा काशिद अभिनय पुरस्काराने विजय पोवार, सागर चौघुले यांचा मरणोत्तर सन्मान

वीर शिवा काशिद अभिनय पुरस्काराने विजय पोवार, सागर चौघुले यांचा मरणोत्तर सन्मान

Next

प्रज्ञानने घडवला विवेकाचा जागर : वारणानगरमध्ये रंगला दृश्यकलांचा महोत्सव

आॅनलाईन लोकमत

वारणानगर, दि. १३ : प्रज्ञान कला अकादमी तर्फे कला महोत्सवात या वर्षापासून सुरु केलेला वीर शिवा काशिद अभिनय पुरस्कार यंदा मरणोपरांत विजय शंकर पोवार व सागर चौघुले यांना जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक, वारणा समूहाचे अध्यक्ष विनय कोरे (सावकर) यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. पोवार व चौगुले कुटुंबीयांनी तो स्वीकारला.

या प्रसंगी इतिहास संशोधक आणि शस्त्र संग्राहक गिरीश जाधव, दिलीप जगताप, वारणा बँकेचे संचालक प्रमोद कोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अग्निदिव्य नाटकातील एक प्रसंगही ध्वनिचित्रफितीद्वारे दाखविण्यात आला. यावेळी सुनील माने, प्रकाश पाटील, कपिल मुळे , स्नेहल संकपाळ, दिग्विजय कालेकर, शेखर गुरव, सुरेश पाटील आदी उपस्थित होते.

नृत्य कलाकार नुपूर रावळ तोरो व त्यांच्या प्रज्ञान शिष्यांची कथ्थक सादरीकरण झाले. या प्रसंगी या मुलींच्या आरोग्याची काळजी वाहणाऱ्या आणि समुपदेशन करणाऱ्या डॉ. प्रज्ञा रोकडे यांचा अभिनेते स्वप्नील राजशेखर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या उपक्रमाचे राजशेखर यांनी विशेष कौतुक केले. कोडोली येथील वसंत संगीत विद्यालयातर्फे विद्यर्थ्यांचे गायन झाले.

विवेकी लघुपटाच्या दिग्दर्शकांबरोबर संवाद

समिक्षक व क्युरेटर डॉ. अनमोल कोठाडिया यांनी स्वप्नील राजशेखर (सावट), अजय कुरणे (बलुतं), समीर वंजारी (कोष) या दिग्दर्शकांबरोबर संवाद साधत या लघुपटांची निर्मितीप्रक्रिया उलगडून दाखविली. यावेळी चौकट व सावट या लघुपटाचे सिनेछायाचित्रकार अभिषेक शेटे याने आशयाशी निगडित तंत्रविचार समजावून सांगितला. चौकट (उमेश बगाडे) मधील मानवतावादी आशयाला व्यापक परिमाण देणाऱ्या विजय शंकर पोवार यांच्या अभिनयाबद्दल विशेषत्वाने प्रतिक्रिया आल्या.

निवडक लघुपटांचे प्रदर्शन

नागराज मंजुळे यांचे आटपाट व महाराष्ट्र अनिस यांनी आयोजित "विवेक" लघुपट स्पधेर्तील पुरस्कारविजेते आणि निवडक काही लघुपट दाखवण्यात आले. "कोष" मधील मासिक पाळीच्या आगमनाने मुलींच्या जगण्यावर लादली जाणारी बंधने आणि त्यांची घुसमट अत्यंत तरलतेने प्रत्ययकारी झाली आहे. पावला (निलेश शेलार), वारी (गौरव जोशी, आशिष सावंत), श्रद्धा (अजित खैरनार), अंकुर (अक्षय देशपांडे), लिंबू मिरची (सुयोग झेंडे), लाइन आॅफ कंट्रोल (श्रीकांत वाळेकर), लाईन (हृषीकेश तुराई) हे लघुपटही दाखवण्यात आले.

लागीर (प्रतिक जाधव) या माहितीपटात एका शाळेतील महाराष्ट्र अनिस इचलकरंजीच्या घोस्ट बूस्टर मोहिमेवरील उपक्रमात सहभागी सुनील स्वामी यांनी प्रेक्षकांच्या तिरकस प्रश्नांनाही खमंग उत्तरे दिली. एकनाथ ऐतवडे, डॉ . कांबळे, संजीवनी बुळे, लालासो घोरपडे, कवी अमित प्रभा वसंत यांनी संवादात सहभाग घेतला. अमित प्रभा वसंत, विपुल देशमुख, सुरज मधाळे, शशिकांत शेटे, शौनक भूतकर याबरोबरच अनिसचे रमेश वडणगेकर, कृष्णात कोरे, संभाजी भोसले, संघसेन जगतकर, राजवैभव कांबळे उपस्थित होते. रमेश हराळे, निलेश आवटी, केदार सोनटक्के, अनिकेत ढाले, मंगेश कांबळे, विकास मिनेकर, नेहा आवटी यांचा नियोजनात सहभाग होता.

Web Title: Veer Shiva Kashyad Award for Best Actor award by Vijay Powar, Sagar Choughule's posthumous honor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.