पंचगंगा नदी प्रदूषित करणाऱ्यांची गय नको

By admin | Published: May 21, 2017 12:47 AM2017-05-21T00:47:24+5:302017-05-21T00:47:24+5:30

विभागीय आयुक्तांच्या प्रदूषण नियंत्रणला सूचना : ३१ गावांसाठी शंभर कोटींचा आराखडा तयार

The victims of Panchaganga river polling have not been found | पंचगंगा नदी प्रदूषित करणाऱ्यांची गय नको

पंचगंगा नदी प्रदूषित करणाऱ्यांची गय नको

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेसह सर्वच घटकांना ठरावीक कालावधी द्या. त्या कालावधीत शुद्धिकरण प्रकल्प उभे केले नाहीत, तर त्यांची गय करू नका, अशा सूचना पंचगंगा प्रदूषणाबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाला केल्याची माहिती विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. ३९ गावांवरच लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना देऊन त्यातील आठ गावांचा प्रश्न नाबार्डच्या मदतीने मार्गी लागला आहे. उर्वरित ३१ गावांसाठी जिल्हा परिषदेने शंभर कोटींचा आराखडा तयार केला असून, तो लवकरच सरकारकडे पाठविण्याची सूचनाही संबधितांना केल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, महापालिकेचे शुद्धिकरण प्रकल्प प्रगतिपथावर असून, इचलकरंजी ‘एसटीपी’ प्लॅन्ट जागेअभावी प्रलंबित आहेत. १७४ गावांतील सांडपाण्याचा प्रश्न आहे; पण त्यापैकी ३९ गावे ७० टक्के प्रदूषण करतात. त्यामुळे पहिल्या टप्प्यात तेथील सांडपाण्याबाबत उपाय करावे लागणार आहेत. त्यातील आठ गावांमध्ये नाबार्डच्या सहकार्याने शुद्धीकरण प्रकल्प मंजूर झाले आहेत. उर्वरित ३१ गावांकडे आता लक्ष द्यावे लागणार आहे. जिल्हा परिषदेने २०१४ ला ३९ गावांचा १०८ कोटींचा आराखडा सादर केला होता; पण आता ३१ गावांचा आराखडा सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय दहा साखर कारखाने व औद्योगिक वसाहतीमधून प्रदूषण होते. यासाठी त्यांना युनिटनिहाय नोटिसा देऊन कालमर्यादा द्या.


जादा गाळप करणाऱ्यांनी क्षमता वाढवावी
गेल्या हंगामात क्षमतेपेक्षा जादा गाळप करणाऱ्या साखर कारखान्यांवर फौजदारी दाखल केली आहे. त्यांनी आपल्या वाढलेल्या सांडपाण्याचेही नियोजन करून प्लॅन्टची क्षमता वाढवावी, असे आवाहन दळवी यांनी केले.
उचगाव, शिरोली पुलाची, पट्टणकोडोली, हुपरी, कबनूर, रुकडी, हातकणंगले, शिरोळ या आठ गावांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी ‘नाबार्ड’कडून प्रत्येकी साडेचार कोटी उपलब्ध होणार आहेत. यामुळे एकूण प्रदूषणापैकी ५१ टक्के प्रदूषण कमी होण्यास मदत होणार असल्याचे दळवी यांनी सांगितले.

Web Title: The victims of Panchaganga river polling have not been found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.