ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील दुसरा संशयित वीरेंद्र तावडेची व्हिडीओ कॉन्फरन्सिंग लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 05:49 AM2017-10-26T05:49:31+5:302017-10-26T05:49:42+5:30
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील दुसरा संशयित डॉ. वीरेंद्र तावडे याच्याशी जिल्हा न्यायाधीश एल. डी. बिले बुधवारी होणा-या सुनावणीवेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार होते
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील दुसरा संशयित डॉ. वीरेंद्र तावडे याच्याशी जिल्हा न्यायाधीश एल. डी. बिले बुधवारी होणा-या सुनावणीवेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार होते; परंतु त्यांनी ही सुनावणी लांबणीवर टाकत दि. ३० नोव्हेंबरला ठेवली.
गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील डॉ. तावडे हा दुसरा संशयित आहे. या प्रकरणातील संशयित समीर गायकवाड हा सध्या जामिनावर बाहेर आहे. त्याचा जामीन रद्द करावा, यासाठी पानसरे कुटुंबीय व एस.आय.टी.ने केलेल्या याचिकेवर ३० आॅक्टोबरला उच्च न्यायालयात सुनावणी आहे. समीर गायकवाड व तावडे यांच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यासंबंधी उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.