मुख्यमंत्र्यांच्या निरोपाची वकिलांना प्रतीक्षा-- खंडपीठ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 09:29 PM2017-09-19T21:29:31+5:302017-09-19T21:30:31+5:30
कोल्हापूर : उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावे, या मागणीच्या बैठकीचा निरोप अद्यापही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आलेला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावे, या मागणीच्या बैठकीचा निरोप अद्यापही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आलेला नाही. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी खंडपीठ कृती समितीला आश्वासन दिले होते; परंतु कोणताच निरोप नसल्याने वकिलांच्यात निराशा पसरली आहे. मंत्री पाटील यांनी लक्ष घालून बैठकीची तारीख लवकर निश्चित करावी, अशी मागणी खंडपीठ कृती समितीकडून होत आहे.
उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावे, या मागणीच्या चर्चेबाबत तारीख निश्चित करण्यासाठी ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांची मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंच्याशी चर्चा झाली होती. त्यावेळी दोन दिवसांत तारीख निश्चितपणे कळवू, असे आश्वासन प्रा. पाटील यांना दिले होते. त्यापासून या तारखेकडे सहा जिल्'ांतील वकिलांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मनावर घेतले तर ‘सर्किट बेंच’ची मागणी मंजूर होईल. त्यासाठी त्यांनी मनापासून प्रयत्न करावेत, असा सूरही वकीलवर्गातून व्यक्त होत आहे. या बैठकीच्या तारखेच्या घोळात वकिलांचे सर्किट बेंचसंबंधी आंदोलन पूर्णत: मागे पडले आहे.