‘राजाराम’ बंधाºयाजवळ पाणी प्रदूषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 12:34 AM2018-01-15T00:34:22+5:302018-01-15T00:35:06+5:30
कसबा बावडा : येथील राजाराम बंधाºयाजवळ पाणी प्रचंड प्रदूषित झाले आहे. या पाण्यावर मोठ्या प्रमाणात तेलकट तवंग पसरला आहे. तसेच नदीतून वाहून आलेला प्लास्टिकचा कचरा, निर्माल्य बंधाºयाजवळ तुंबल्याने व पाण्याचा रंग हिरवट-काळसर झाल्याने पाण्याला उग्र वास येत आहे. बंधाºयातून खालील बाजूस मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याशिवाय पाण्याचे प्रदूषण कमी होणार नाही अशी स्थिती आहे. सध्या बंधाºयाजवळ १४ फूट इतकी पाण्याची पातळी आहे.
राजाराम बंधाºयाला एकूण ५९ मोहरी आहेत. त्यापैकी काही मोजक्याच मोहरींतून पाणी खालील बाजूस सोडले आहे. उर्वरित सर्व मोहरी बंद आहेत. त्यामुळे बंधाºयाजवळील पाणी प्रवाहित न झाल्याने दूषित झाले आहे. या पाण्यात पंचगंगा नदीतून तसेच जयंती नाल्यातून आलेला कचरा सध्या बंधारा अडविल्यामुळे अडकून पडला आहे. याशिवाय जयंती नाल्यातून व बावड्यातील दोन-तीन नाल्यांतून वाहून आलेले दूषित पाणी बंधाºयाजवळ तटल्याने बंधाºयाजवळील पाणी हिरवे-काळे झाले आहे. पाण्याला उग्र वास येत आहे.
या दूषित पाण्याच्या उग्र वासाने बंधाºयावरू ये-जा करणाºया वाहनधारकांना नाकाला काहीवेळा रुमाल लावावा लागतो. येथे पोहण्यासाठी दररोज येणाºया तरुणांची संख्याही दूषित पाण्यामुळे रोडावली आहे. या दूषित पाण्यात आॅक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने आता हळूहळू मासे मृत होण्यास सुरुवात झाली आहे.
राधानगरी धरणातून पाणी सोडल्यास....
सध्या राजाराम बंधाºयाजवळ १४ फूट इतकी पाण्याची पातळी आहे. त्यामुळे बंधाºयातून योग्य त्या प्रमाणात खालील बाजूस पाणी सोडल्यास दूषित पाण्याचे प्रमाण कमी होईल. तसेच ही पातळी भरून येण्यासाठी राधानगरी धरणातून पाणी सोडल्यास शिंगणापूर उपसा केंद्राची पाणी पातळीही स्थिर राहील.
नेजदार फौंडेशनच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविणार
येथील डॉ. संदीप नेजदार फौंडेशनच्यावतीने तसेच बावड्यातील काही तरुण मंडळांची मदत घेऊन राजाराम बंधारा परिसर तसेच बंधाºयात अडकलेला कचरा, निर्माल्य यांची स्वच्छता केली जाईल, असे डॉ. संदीप नेजदार फौंडेशनचे अध्यक्ष व स्थायी समिती सभापती डॉ. संदीप नेजदार यांनी सांगितले.
शेतात पिण्यासाठी घरचे पाणी
राजाराम बंधाºयापासून ते एमआयडीसी पुलापर्यंत शेतात काम करणारे शेतकरी, शेतमजूर पूर्वी नदीचे पाणी पीत असत, परंतु आता शेतकरी, शेतमजूर कधीही नदीचे पाणी शेतात काम करत असताना पीत नाहीत. त्यासाठी घरातून पाणी नेले जाते. इतकी दूषित पाण्याची भीती आता लोकांना वाटत आहे.