व्हाट्सअॅप ग्रुपने साजरा केला हृदयस्पर्शी रक्षाबंधन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2017 09:52 PM2017-08-08T21:52:16+5:302017-08-08T21:52:34+5:30

काही विशेष मुली राखी बांधत होत्या... काही विशेष मुलं राखी बांधून घेत होती...पण सर्वांच्या चेहऱ्यावर भाव होते आनंदाचे, समाधानाचे... आपले रक्षण करण्याचे वचन देण्यासाठी कोणीतरी पुढे आल्यामुळे या विशेष मुला-मुलींना झालेला आनंद खरोखरच अवर्णिय असा होता.

WATSAP Group celebrated the heartfelt Rakshabandhan | व्हाट्सअॅप ग्रुपने साजरा केला हृदयस्पर्शी रक्षाबंधन

व्हाट्सअॅप ग्रुपने साजरा केला हृदयस्पर्शी रक्षाबंधन

Next

- संदीप आडनाईक

कोल्हापूर, दि. 8 - काही विशेष मुली राखी बांधत होत्या... काही विशेष मुलं राखी बांधून घेत होती...पण सर्वांच्या चेहऱ्यावर भाव होते आनंदाचे, समाधानाचे... आपले रक्षण करण्याचे वचन देण्यासाठी कोणीतरी पुढे आल्यामुळे या विशेष मुला-मुलींना झालेला आनंद खरोखरच अवर्णिय असा होता.
निमित्त होते अमिताभ फॅन्स क्लब वर्ल्डवाईडतर्फे आयोजित इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित स्वयम् विशेष मुलांच्या शाळेतील रक्षाबंधन कार्यक्रमाचे. अनोख्या व हृदयस्पर्शी वातावरणात मंगळवारी हा सोहळा साजरा करण्यात आला. या विशेष मुलांनाही सण साजरे करण्याचा आनंद लुटता यावा यासाठी 'स्वयम्'च्या या अनोख्या रक्षाबंधन कार्यक्रमात अमिताभ फॅन्स क्लब वर्ल्डवाईड या व्हाटस्अॅप ग्रुपचे सदस्य मोठया उत्साहाने सहभागी झाले. 
विशेष म्हणजे, यावेळी ग्रुपच्या सदस्या स्मिता सावंत, नितीन राजशेखर व शेफाली मेहता यांनी तीन मुली दत्तक घेऊन सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. तर, विशेष मुलांनी तयार केलेल्या निरनिराळ्या समाजोपयोगी वस्तु व गणेशमुर्ती खरेदी करून त्यांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन ग्रुपतर्फे करण्यात आले. यावेळी ग्रुपचे अॅडमीन अॅड. इंद्रजित चव्हाण, इंडियन रेडक्रॉस सोसायटी  व 'स्वयम' चे उपाध्यक्ष अमरदीप पाटील, संचालक शैलेश देशपांडे, नगरसेवक तौफिक मुल्लाणी, स्मिता सावंत, 'मिसेस महाराष्ट्र' गौरी शिरोडकर, कविता घाटगे, नितीन राजशेखर, किरण शहा, श्रद्धा राणे, शेफाली मेहता इत्यादी सदस्य तसेच शाळेचे प्राचार्य व शिक्षक हजर होते.

Web Title: WATSAP Group celebrated the heartfelt Rakshabandhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.