राज्यातील नऊ हजार सदस्यांचा जात वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न सोडवू : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 01:44 PM2018-08-27T13:44:29+5:302018-08-27T15:44:52+5:30

जात वैधता प्रमाणपत्राअभावी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नऊ हजार सदस्यांच्या पदाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न सोडविण्याबाबत सरकारची भूमिका सकारात्मक आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी येथे दिली.

Will solve the issue of caste validity certificate of nine thousand members of the state: Chandrakant Patil | राज्यातील नऊ हजार सदस्यांचा जात वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न सोडवू : चंद्रकांत पाटील

राज्यातील नऊ हजार सदस्यांचा जात वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न सोडवू : चंद्रकांत पाटील

Next
ठळक मुद्देराज्यातील नऊ हजार सदस्यांचा जात वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न सोडवू सरकारची भूमिका सकारात्मक; चंद्रकांत पाटील यांची माहिती

कोल्हापूर : जात वैधता प्रमाणपत्राअभावी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नऊ हजार सदस्यांच्या पदाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न सोडविण्याबाबत सरकारची भूमिका सकारात्मक आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी येथे दिली.

राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्तीबाबत शिवाजी विद्यापीठात झालेल्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री पाटील म्हणाले, या बैठकी दरम्यानच मला मुख्यमंत्र्यांचा दूरध्वनी आला. यातील चर्चेत त्यांनी जात वैधता प्रमाणपत्राबाबत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नऊ हजार सदस्यांचा प्रश्न असल्याचे सांगितले.

हा प्रश्न सोडविण्याबाबत सरकारची भूमिका सकारात्मक आहे. मात्र, कायदेशीर गुंता आहे. त्याबाबत लॉ सेक्रेटरी यांच्यासमवेत चर्चा करून काय मार्ग निघतो. त्याची माहिती द्यावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

 

Web Title: Will solve the issue of caste validity certificate of nine thousand members of the state: Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.