कोल्हापुरात ड्रेनेजच्या कामासाठी महिलांचा ‘रास्ता रोको’, मैलामिश्रित सांडपाणी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 11:17 AM2017-12-08T11:17:28+5:302017-12-08T11:34:06+5:30
शिवाजी पेठेतील वाळके हॉस्पिटलशेजारी ड्रेनेज तुंबून मैलामिश्रित सांडपाणी रस्त्यावर पसरत असल्याने परिसरातील आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे ड्रेनेज दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, म्हणून संतप्त महिलांनी तासभर रास्ता रोको आंदोलन केले.परिसरात दुर्गंधी पसरून डासांचा उपद्रव वाढला आहे. परिसरात तापाचे तीन ते चार रुग्ण आढळून आले आहेत.
कोल्हापूर : शिवाजी पेठेतील वाळके हॉस्पिटलशेजारी ड्रेनेज तुंबून मैलामिश्रित सांडपाणी रस्त्यावर पसरत असल्याने परिसरातील आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे ड्रेनेज दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, म्हणून संतप्त महिलांनी तासभर रास्ता रोको आंदोलन केले.
शिवाजी पेठेतील उभा मारुती चौक ते जुना वाशी नाका या मार्गावर वाळके हॉस्पिटलजवळील ड्रेनेज तुंबल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मैलामिश्रित सांडपाणी रस्त्यावर पसरत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून डासांचा उपद्रव वाढला आहे. परिसरात तापाचे तीन ते चार रुग्ण आढळून आले आहेत.
ड्रेनेज दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करावे, या मागणीसाठी महिलांनी सकाळी दहा वाजता अचानक रास्ता रोको आंदोलन केले. ऐन गर्दीच्या वेळी अचानक रास्ता रोको झाल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली.
‘रास्ता रोको’ची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक अजिंक्य चव्हाण हे घटनास्थळी गेले आणि त्यांनी रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या महिलांची बाजू ऐकून घेतली. त्यानंतर त्यांनी ड्रेनेज दुरुस्तीचे काम येत्या दोन दिवसांत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर महिलांनी आपले आंदोलन मागे घेतले.
या आंदोलनात अपर्णा मोरे, मनीषा ठोंबरे, स्वाती निकम, अनुराधा मोरे, मेघा थोरात, स्नेहल पोवार, संयोगिता पोवार, सारिका मोरे, उषा शिंदे, सुनीता शिंदे, अर्चना पाटील, माधुरी धरपणकर यांनी भाग घेतला.