कोल्हापुरात काळ्या फिती लावून काम; रुग्णसेवेवर परिणाम नाही
By admin | Published: March 20, 2017 05:53 PM2017-03-20T17:53:27+5:302017-03-20T17:53:27+5:30
सायनमध्ये निवासी डॉक्टर मारहाण
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर,दि. २0 : मुंबईतील सायन रुग्णालयामध्ये निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांकडून मारहाण झाल्याचे पडसाद सोमवारी राज्यभरात उमटले; पण, कोल्हापुरात ‘मार्ड संघटनेच्या सुमारे १३२ निवासी डॉक्टरांनी या ‘काम बंद’ आंदोलन न करता सीपीआरमध्ये काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध केला.
रविवारी सायन मुंबई येथे निवासी डॉक्टरला मारहाण झाली. दोनच दिवसांपूर्वी असाच प्रकार धुळे व नाशिक या ठिकाणी झाला होता. हे प्रकरण ताजे असतानाच सायनमध्ये हा प्रकार घडला. त्यामुळे राज्यभरात ‘महाराष्ट्र असोसिएशन आॅफ रेसिडेन्सी डॉक्टर’ (मार्ड) या संघटनेचे निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर गेले आहेत; परंतु, कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) कार्यरत असलेले सुमारे १३२ निवासी डॉक्टरांनी सोमवारी काळ्या फिती लावून कामास सुरुवात केली. त्यामुळे रुग्णसेवेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे ‘मार्ड’चे जिल्हाध्यक्ष डॉ. रामप्रसाद राजेभोसले यांनी सांगितले.