कोल्हापूरमधील केआयटी महाविद्यालयात मंगळवारी ‘ए वर्ल्ड इन मोशन’ स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 06:44 PM2017-12-13T18:44:15+5:302017-12-13T18:54:38+5:30
कोल्हापूर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीचे कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग (केआयटी) मधील मेकॅनिकल विभागाच्या ‘सोसायटी आॅफ आॅटोमोटिव्ह इंजिनिअर्स’ या चॅप्टरअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी मंगळवारी (दि. १९) ‘ए वर्ल्ड इन मोशन’ (ए.डब्ल्यू.आय.एम.) ही अभिनव स्पर्धा होणार आहे, अशी माहिती या स्पर्धेचे प्रादेशिक निमंत्रक सुभाष माने व विद्यार्थी समन्वयक ओझेर हुदली यांनी बुधवारी दिली.
कोल्हापूर : कोल्हापूर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीचे कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग (केआयटी) मधील मेकॅनिकल विभागाच्या ‘सोसायटी आॅफ आॅटोमोटिव्ह इंजिनिअर्स’ या चॅप्टरअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी मंगळवारी (दि. १९) ‘ए वर्ल्ड इन मोशन’ (ए.डब्ल्यू.आय.एम.) ही अभिनव स्पर्धा होणार आहे, अशी माहिती या स्पर्धेचे प्रादेशिक निमंत्रक सुभाष माने व विद्यार्थी समन्वयक ओझेर हुदली यांनी बुधवारी दिली.
शालेय विद्यार्थ्यांना मूलभूत अभियांत्रिकी कौशल्याची माहिती देणे, तरुण वयात इंजिनिअरिंगच्या आॅटोमोटिव्ह अॅप्लिकेशनच्या दिशेने झुकण्याचा दृष्टिकोन राखण्यासाठी ‘ए वर्ल्ड इन मोशन’ ही स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थी भौतिकशास्त्राच्या मूलभूत नियमांवर आधारित प्रतिकृती (मॉडेल) बनवतील, त्याचे सादरीकरण करतील.
या स्पर्धेपूर्वी ‘केआयटी’च्या विदयार्थी स्वयंसेवकांनी शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धेची माहिती सांगून त्यांना प्रशिक्षण दिले आहे. प्रा. सुभाष माने, अमोल पाटील यांनी स्पर्धेच्या तांत्रिक बाबींचे महत्त्व सांगितले. या स्पर्धेसाठी प्रा. सौरभ पाटील, अक्षय दशवंत हे समन्वयक, तर ओझेर हुदली हे विदयार्थी समन्वयक म्हणून काम पाहत आहेत.
विद्यार्थी समन्वयक हुदली आणि चिंतन जोशी, पुष्कराज कुलकर्णी , अनीश घाटगे, ऋषिकेश माळी, अभिषेक चव्हाण, श्रेयस कुलकर्णी , संकेत कोडोलीकर, करण पारेख, श्रेयस शहा, सौरभ कालेकर, अजिंक्य जाधव, दुष्यंत गोवर्धन, वैष्णवी मोकाशी, मयूरी साने यांनी शालेय स्तरावरील प्रशिक्षण आणि स्पर्धा घेतली. त्यांना ‘केआयटी’चे अध्यक्ष सचिन मेनन, उपाध्यक्ष भरत पाटील, सचिव साजिद हुदली, संचालक डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी यांचे मार्गदर्शन लाभले.
दहा शाळांचा सहभाग
न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल, संजय घोडावत, डे बोर्डिंग स्कूल, निवासी शाळा, सीआयई स्कूल, ओरिएंटल इंग्लिश मीडियम स्कूल, विद्यामंदिर हिरवडे खालसा, सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूल, सिद्धेश्वर विद्यालय, कुर्ली; विद्यामंदिर नंदगाव, श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूल (कागल) या शाळांतील एकूण ९०९ विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाल्या आहेत.
नऊ वर्षांपूर्वी स्पर्धेची सुरुवात
सोसायटी आॅफ आॅटोमोटिव्ह इंजिनिअर्सच्या ए.डब्ल्यू.आय.एम. या स्पर्धेची संकल्पना अमेरिकेमध्ये सुरू झाली. यानंतर भारतामध्ये हा कार्यक्रम राबविला जात आहे. एडब्ल्यूआयएम प्रथम सन २००८ मध्ये राष्ट्रीय स्तरावर सुमारे ६० विद्यार्थ्यांसह सुरू झाले. आता त्याची व्याप्ती वाढली आहे.