हिरोईन करतो म्हणून दोन मुलींचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2017 03:47 AM2017-01-03T03:47:46+5:302017-01-03T03:47:46+5:30

चित्रपटात अभिनेत्रीचे काम देतो म्हणून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करणाऱ्या तथाकथित चित्रपट निर्माता-दिग्दर्शक असलेल्या विजय व राहुल खडके या दोघा बंधूना पोलिसांनी गजाआड केले

Two girls abducted as heroin | हिरोईन करतो म्हणून दोन मुलींचे अपहरण

हिरोईन करतो म्हणून दोन मुलींचे अपहरण

Next

लातूर : चित्रपटात अभिनेत्रीचे काम देतो म्हणून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करणाऱ्या तथाकथित चित्रपट निर्माता-दिग्दर्शक असलेल्या विजय व राहुल खडके या दोघा बंधूना पोलिसांनी गजाआड केले असून मुलींची सुखरुप सुटका केली आहे.
लातूर शहरातील दोन अल्पवयीन मुलींना चित्रपटात अभिनेत्रीचे काम देण्याचे आमिष रेणापूर तालुक्यातील मोहगाव (तळणी) येथील विजय व राहुल या सख्ख्या भावांनी दाखविले. परळी येथे या मुलींना नेऊन काही दिवस चित्रीकरणही केले. रविवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास खडके बंधूंनी दोन्ही मुलींना कॉफी पिण्याच्या निमित्ताने मोहगाव येथे नेले. मुली घरी आल्या नसल्याने आई-वडिलांनी चौकशी केली असता त्या खडके बंधूंसोबत असल्याचे समजले. पालकांनी भ्रमणध्वनीवरून मुलींशी संपर्क साधला असता त्यांना पळवून नेल्याचे समजले. त्यामुळे पालकांनी थेट एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी मोहगाव (तळणी) गाठून मुलींना व खडके बंधूंना सोमवारी पहाटे लातुरात आणले. खडके बंधूंविरुद्ध कलम ३६३, ३६६ (अ) ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
अपहरणातील दोन्ही मुली या मैत्रिणी आहेत. त्या दोघींनाही खडके बंधूंनी चित्रपटात अभिनेत्री करण्याचे आमिष दाखविले. काही दिवस परळी येथे तथाकथित चित्रपटाचे चित्रीकरणही करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणात हे दोन बंधूच आहेत की आणखी काही साखळी आहे, याबाबत तपास सुरू असल्याचे तपास अधिकारी पवन यादव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. रेणापूर तालुक्यातील मोहगाव येथील रहिवासी असलेले विजय व राहुल खडके हे दोघे भाऊ आपण चित्रपट निर्माते असल्याचे भासवत दोन-तीन महिन्यांपासून फिर्यादीच्या घरी भाडेकरू म्हणून राहत होते, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. अद्याप त्यांनी घरभाडेही दिलेले नाही.

Web Title: Two girls abducted as heroin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.