राज्यात महिनाभरात १० मराठा वसतिगृहे- चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 01:22 AM2018-08-04T01:22:53+5:302018-08-04T01:23:12+5:30
मराठा समाजाला आरक्षण देण्यास आम्ही बांधील आहोत. मात्र, तोपर्यंत या समाजातील युवक आणि विद्यार्थ्यांसाठी शासनाने जे निर्णय घेतले आहेत. त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.
कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्यास आम्ही बांधील आहोत. मात्र, तोपर्यंत या समाजातील युवक आणि विद्यार्थ्यांसाठी शासनाने जे निर्णय घेतले आहेत. त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून महिनाभरात सोलापूर, उस्मानाबादसह राज्यातील दहा ठिकाणी मराठी वसतिगृहे सुरू केली जातील, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे केले.
येथील विचारेमाळ परिसरात राज्य शासनातर्फे उभारण्यात आलेल्या ‘डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह’ या राज्यातील पहिल्या मराठा विद्यार्थी वसतिगृहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पाटील म्हणाले, आरक्षण मिळेपर्यंत राज्य सरकारने मराठा समाजातील युवक, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, दहा लाखांपर्यंतच्या कर्जासाठी बँक गॅरंटी आणि निम्म्या शुल्कामध्ये महाविद्यालयात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला.