मुंबईतील १० पोलीस उपायुक्तांच्या बदल्या
By admin | Published: May 5, 2017 03:50 AM2017-05-05T03:50:03+5:302017-05-05T03:50:03+5:30
मेगा बदल्यांमध्ये मुंबईत उपायुक्त म्हणून नियुक्त झालेल्या काही पोलीस उपायुक्तांकडे महत्त्वाच्या जबाबदारी सोपवत पोलीस
मुंबई : मेगा बदल्यांमध्ये मुंबईत उपायुक्त म्हणून नियुक्त झालेल्या काही पोलीस उपायुक्तांकडे महत्त्वाच्या जबाबदारी सोपवत पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांनी मुंबई पोलीस दलात मोठा फेरबदल केला आहे. यामध्ये मुंबई पोलीस दलातील १० उपायुक्तांची अंतर्गत बदली करण्यात आली आहे.
नवी मुंबईतून आलेले उपायुक्त दिलीप सावंत यांची गुन्हे शाखत नियुक्ती केली आहे. तर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विनय कुमार राठोड यांना परिमंडळ बाराची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त सुरक्षा विभागाचे राजेंद्र दाभाडे यांच्याकडे गुन्हे शाखेत अंमलबजावणी विभागात नेमणूक करण्यात आली आहे. तर पोलीस उपायुक्त मुख्यालयाचे प्रदीप सावंत यांच्याकडे मुंबईच्या सुरक्षा विभागाची जबाबदारी दिली आहे. ठाणे शहरच्या उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांना पोलीस प्रवक्ता आणि पोलीस उपायुक्त अभियान ही जबाबदारी दिली आहे. तर पोलीस प्रवक्ते अशोक दुधे यांची वाहतूक शाखेत शहर उपायुक्तपदी नियुक्ती केली आहे. मुंबई रेल्वे पोलीस उपायुक्त दिपक देवराज यांची महिला अत्याचार प्रतिबंधक विभागात, अहमदनगरचे पोलीस अधिक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांना वाहतूक शाखेत मुख्यालय आणि पूर्व उपनगरच्या उपायुक्तपदी आणि नांदेडचे अधीक्षक संजय एनपुरे यांना विशेष शाखेचे पोलीस उपायुक्तपदी नेमले आहे.
सायबर सेलचे उपायुक्त अखिलेशकुमार सिंह यांना परिमंडळ तीनचे उपायुक्त पदी, परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त परमजीत दहिया यांची परिमंडळ नऊ येथे तर त्यांच्या जागी राज्य राखीव पोलीस बलगट नवी मुंबईचे समादेशक राजीव जैन यांची नियुक्ती केली आहे.
परिमंडळ आठचे उपायुक्त विरेंद्र मिश्रा यांची पोलीस मुख्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागेवर वाहतूक विभागाचे अनिल कुंभारे यांना नियुक्ती केली आहे. परिमंडळ दहाचे उपायुक्त विनायक देशमुख यांची संरक्षण विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर औरंगाबाद ग्रामीणचे अधीक्षक एन. डी. रेड्डी यांची नेमणूक करण्यात आली आहे. सुरक्षा विभागाचे उपायुक्त आनंद मांड्या यांची सशस्त्र पोलीस कोळे कल्याण कलीना मुंबई येथे नियुक्ती केली आहे. (प्रतिनिधी)
बदल्या रद्द करुन नव्याने नियुक्ती
मुंबईचे उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांची दोन वेळा झालेली नियुक्ती रद्द करुन त्यांना फोर्सवनमध्ये अप्पर पोलीस अधिक्षक पदावर बसविले आहे. तसेच मुंबई गुन्हे शाखेचे उपायुक्त शशिकांत सातव यांची बदली रद्द करुन त्यांना अमरावती शहरचे पोलीस उपायुक्त म्हणून नवनियुक्ती देण्यात आली आहे. तर पुणे शहराचे उपायुक्त श्रीकांत पाठक यांना मुंबईत येण्यापूर्वीच दौड येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ७ चे समादेशक म्हणून नियुक्ती केली आहे. तर पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे यांना फोर्स वन मुंबईच्या पोलीस अधीक्षक पदावर नवनियुक्ती करण्यात आली आहे.