कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 05:26 AM2024-05-07T05:26:24+5:302024-05-07T05:26:48+5:30

निर्यात बंदीमुळे नुकसान : जगातील  ६० पेक्षा जास्त देशांमध्ये भारतातून कांदा निर्यात केला जातो. त्यात महाराष्ट्राचा वाटा ४० टक्के असतो.

1,173 crores worth of onion; The farmers of the state were hit by Rs 3 lakh per acre | कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका

कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका

योगेश बिडवई/नामदेव मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई/नवी मुंबई : केंद्र सरकारने लादलेल्या कांदा निर्यातीवरील बंदीमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रातील ६ लाख ९४ हजार ९२९ मेट्रि्क टन कांदा निर्यात कमी झाली असून, राज्याचे १,१७३ कोटींचे नुकसान झाले आहे. निर्यातबंदीमुळे देशांतर्गत भाव निम्म्यावर आल्यामुळे शेतकऱ्यांना या वर्षातील दोन हंगामात प्रतिएकरी तीन लाखांचा फटका सहन करावा लागला आहे.   

जगातील  ६० पेक्षा जास्त देशांमध्ये भारतातून कांदा निर्यात केला जातो. त्यात महाराष्ट्राचा वाटा ४० टक्के असतो. नाशिक जिल्हा देशातील कांद्याचे आगर समजला जातो. 

मात्र, वारंवार होणाऱ्या निर्यातबंदीचा व्यापाराला मोठा फटका बसत आहे.    निर्यातीमध्ये दुप्पट वाढ झाल्याने स्थानिक बाजारपेठेतही कांद्याला चांगला भाव मिळू लागला होता; परंतु २०२३-२४ या वर्षात आधी निर्यातीवर शुल्क लावणे, तसेच निर्यातबंदी केल्यामुळे वर्षभरात निर्यात घटून १,८७५ कोटींवर आली.   गतवर्षीच्या तुलनेत राज्याची निर्यातीमधील उलाढाल १,१०० कोटींनी कमी झाली.  

देशातील निर्यातीची स्थिती
वर्ष    निर्यात (टन)    किंमत (कोटी)
२०२०-२१    १५,७८,०१६    २,८२६
२०२१-२२     १५,३७,४९६    ३,४३२
२०२२-२३    २५,२५,२५८    ४,५२२
२०२३-२४     १७,०७,९९८    ३,८७३

राज्यातून किती झाली निर्यात
वर्ष    निर्यात (टन)    किंमत (कोटी)
२०२०-२१    ७९८९९२    १,५२०
२०२१-२२    ५,७९,०६४    १,४०१
२०२२-२३    १४,४५,१७३    २,८४८
२०२३-२४    ७,५०,२४४    १,६७५ 

देशाचे ६४९ कोटींचे नुकसान
nजगातील सर्वांत मोठा कांदा उत्पादक देश म्हणून भारताची ओळख आहे. मात्र, वर्षभरात देशातून ८ लाख १७ हजार टन कांदा निर्यात कमी झाली असून, त्यामुळे तब्बल ६४९ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. कांदा निर्यातबंदीमुळे मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगण, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात या राज्यांतील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचेही आर्थिक नुकसान झाले आहे.

कांदा निर्यातीवर वारंवार निर्बंध टाकल्यामुळे निर्यात कमी झाली आहे. त्यामुळे देशांतर्गत भाव कोसळून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शासनाने निर्यात कायम खुली करणे आवश्यक आहे.
- अनिल घनवट, राष्ट्रीय अध्यक्ष, स्वतंत्र भारत पक्ष 

Web Title: 1,173 crores worth of onion; The farmers of the state were hit by Rs 3 lakh per acre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.