Live updates: मीरा-भाईंदरमध्ये भाजपाचाच बोलबाला, स्वबळावर सत्ता स्थापन करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2017 04:55 AM2017-08-21T04:55:56+5:302017-08-21T15:27:40+5:30

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या निवडणुकीसाठी रविवारी मुसळधार पावसातही ४७ टक्के मतदान झाले. येथील बहुरंगी लढतीत ५०९ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदानयंत्रात बंदिस्त झाले. मतमोजणी सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे.

 47 percent polling in Mira-Bharindar, starting from 10 am, will start counting | Live updates: मीरा-भाईंदरमध्ये भाजपाचाच बोलबाला, स्वबळावर सत्ता स्थापन करणार

Live updates: मीरा-भाईंदरमध्ये भाजपाचाच बोलबाला, स्वबळावर सत्ता स्थापन करणार

googlenewsNext

भार्इंदर, दि. 21 - मीरा- भाईंदर महानगरपालिकेमध्ये भाजपाची एकहाती सत्ता आली आहे. 54 जागांवर भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयाचा भाजपा कार्यकर्ते जल्लोष साजरा करत आहेत.

विजयी निकाल

भाजपा 54

शिवसेना 17

काँग्रेस 10

अपक्ष 2

LIVE UPDATES

प्रभाग क्रमांक 1 - भाजपाचे 4 उमेदवार विजयी
- 1 A सुनीता भोईर ( 6084 मते )
- 1 B रिता शाह  (5729 मते)
- 1 C अशोक तिवारी ( 5144 मते) 
- 1 D पंकज पांडे ( 5742 मते)

प्रभाग क्रमांक 5

- 5 A भाजपाच्या मेघना रावळ विजयी ( 7029 मते)
- 5 D मुन्ना सिंह विजयी ( 8109 मते)

- 5 K भाजपाचे राकेश शाह विजयी (6322 मते)

प्रभाग क्रमांक 8 - भाजपाचे तीन आणि शिवसेनेचा 1 उमेदवार विजयी
प्रभाग क्रमांक 9 -  काँग्रेसचे चारही उमेदवार विजयी
- 9 A  गीता परदेसी ( 4718 मते)

- 9 K नूरजहाँ हुसैन विजयी ( 4191 मते)
- 9 D  अपक्ष उमेदवार अमजद शेख विजयी ( 3178 मते)
प्रभाग क्रमांक 12 - भाजपाच्या चारही उमेदवारांचा विजय

-12 A डॉ. प्रीती पाटील ( 3577 मते )   
- 12 B डिम्पल मेहता (  3712 मते)
- 12 D हसमुख गहलोत ( 3574 मते) 
- 12 K अरविंद शेट्टी ( 3317 मते)   

प्रभाग क्रमांक 13 -  

-  13 A शिवसेनेच्या रुपाली शिंदे विजयी ( 4151 मते )

- 13 B भाजपाचे संजय थेरडे विजयी ( 4255 मते )

- 13 D भाजपाचे चंद्रकांत वैती विजयी  ( 4535 मते )

- 13  K भाजपाच्या अनिता मुखर्जी विजयी ( 3883 मते ) 

प्रभाग क्रमांक 14 - भाजपा पॅनलचे चारही उमेदवार विजयी

प्रभाग क्रमांक 17  -
17 A भाजपाचे आनंद मांजरेकर विजयी ( 4277 मते )
17 B भाजपाच्या दीपिका अरोरा विजयी ( 4827 मते )

17 D भाजपाचे प्रशांत दळवी विजयी ( 4101 मते)

17K भाजपाच्या हेमा बेलानी विजयी  ( 4721 मते )

47 टक्के झाले मतदान

रविवारी सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली, तेव्हापासून पहिल्या दोन तासांत मतदानाचा आकडा सहा टक्क्यांवर होता. नंतर तो वाढत पुढील दोन तासांत १४ टक्के झाला, पण रविवार आणि मुसळधार पावसामुळे दुपारपर्यंत मतदानाचा आकडा संथगतीने वाढत होता. त्यामुळे उमेदवार, राजकीय नेत्यांनी मतदारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सोशल मीडियावरही आवाहन सुरू झाले आणि दुपारी साडेतीननंतर मतदानाचा टक्का हळूहळू वाढू लागला.

मीरा रोड येथे आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन शाळेतील मतदानकेंद्रात एका अधिकृत मतदाराच्या नावावर बोगस मतदान झाल्याची चर्चा सुरू झाली, पण गुन्हा नोंदविला गेला नाही. भार्इंदरमध्ये शिवसेना-भाजपाचे कार्यकर्ते आक्रमकपणे परस्परांसमोर उभे ठाकल्याने, त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.

यंदाच्या निवडणुकीत १७ तृतीयपंथी मतदारांची नोंद करण्यात आली होती. त्यांच्यापैकी प्रभाग १७मधील एका तृतीपयंथी मतदाराने मतदानाचा हक्क बजाविला.

 

 

मावळत्या पालिकेतील पक्षीय बलाबल
- एकूण जागा - 95
भाजपा-32 

शिवसेना -15

काँग्रेस - 18 

राष्ट्रवादी - 26

बहुजन विकास आघाडी - 3

 अपक्ष -1 


पाच वर्षात दोन सत्ता 
- मागील निवडणुकीनंतर पहिल्या अडीच वर्षात  काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी, अपक्षांची सत्ता होती. 
- पण नंतरच्या अडीच वर्षात भाजपा, शिवसेना एकत्र आले आणि त्यांनी बहुजन विकास आघाडी, अपक्षांची मदत घेत सत्ता स्थापन केली. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधात बसवले. 

Web Title:  47 percent polling in Mira-Bharindar, starting from 10 am, will start counting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.