मराठवाड्यात 3 आठवड्यांत 65 शेतक-यांची आत्महत्या

By Admin | Published: April 28, 2016 01:59 PM2016-04-28T13:59:46+5:302016-04-28T17:21:46+5:30

दुष्काळग्रस्त मराठवाड्यात एप्रिल महिन्याच्या पहिल्या तीन आठवड्यांत 65 शेतक-यांनी आत्महत्या केली आहे

65 farmers commit suicide in Marathwada 3 weeks | मराठवाड्यात 3 आठवड्यांत 65 शेतक-यांची आत्महत्या

मराठवाड्यात 3 आठवड्यांत 65 शेतक-यांची आत्महत्या

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत -
औरंगाबाद, दि. 28 - दुष्काळग्रस्त मराठवाड्यात एप्रिल महिन्याच्या पहिल्या तीन आठवड्यांत 65 शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्या करणा-या शेतक-यांचा आकडा आता 338 वर पोहोचला आहे. बीडमध्ये सर्वोत जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहे. 
 
बीडमध्ये सर्वात जास्त 60 त्यानंतर औरंगाबादमध्ये 57 आणि नांदडेमध्ये 50 शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. लातूरमध्ये 44, उस्मानाबादमध्ये 43, जालनामध्ये 37, परभणीमध्ये 27 आणि हिंगोलीमध्ये 20 शेतक-यांनी आत्महत्या करुन जीवनयात्रा संपवली आहे. आत्महत्या करणा-या शेतक-यांपैकी 146 जणांच्या कुटुंब मदत मिळण्याठी पात्र आहेत तर 117 प्रकरणी चौकशी सुरु असल्याचं अधिका-यांनी सांगितलं आहे. 75 अर्ज नाकारण्यात आले आहेत.
 
केंद्रीय कृषीनंत्री राधामोहन सिंग यांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार नव्या योजना आखून शेतक-यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं होतं. मनरेगा आणि आरोग्य योजनांअंतर्गत शेतक-यांना काम देण्याचा प्रयत्न करत असल्याचं अधिका-याने सांगितलं आहे. राज्यात गतवर्षी 2015 मध्ये 3228 शेतक-यांनी आत्महत्या केली होती. हा आकडा 14 वर्षातील उच्चांक होता. 
 

 

Web Title: 65 farmers commit suicide in Marathwada 3 weeks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.