सवाई महोत्सवाने पेठांची सीमा ओलांडली : यंदा मुकुंदनगरमध्ये भरणार सुरांचा मेळा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 05:15 PM2018-10-10T17:15:56+5:302018-10-10T17:18:46+5:30

आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणारा मानाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव  यंदा प्रथमच पुणे शहरातील मध्यवर्ती  असलेला पेठांचा भाग ओलांडून मुकुंदनगर येथे होणार आहे.

The 66th Sawai Mahotsav will organised at Mukundnagar Pune | सवाई महोत्सवाने पेठांची सीमा ओलांडली : यंदा मुकुंदनगरमध्ये भरणार सुरांचा मेळा 

सवाई महोत्सवाने पेठांची सीमा ओलांडली : यंदा मुकुंदनगरमध्ये भरणार सुरांचा मेळा 

Next
ठळक मुद्देयंदाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव यंदा १२ ते १६ डिसेंबर मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल येथे होणार महोत्सवाचे आयोजन 

पुणे : आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणारा मानाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव  यंदा प्रथमच पुणे शहरातील मध्यवर्ती  असलेला पेठांचा भाग ओलांडून मुकुंदनगर येथे होणार आहे. येत्या १२ ते १६ डिसेंबर या काळात मकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात येणार आहे. मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी ही माहिती दिली. 

         गेली बत्तीस वर्षे हा महोत्सव डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथे होत असे. यंदा सोसायटीने शाळेची जागा महोत्सवासाठी देता येणार नाही, असे लेखी पत्र दिल्यामुळे जागेतील हा बदल करण्यात येत आहे. यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक रसिक, संस्थाचालक आणि हितचिंतक यांनी संस्थेशी संपर्क साधून याबाबत काय करता येईल, याबद्दल विचारणा केली. या सगळ्यांच्या भावनांचा आर्य संगीत प्रसारक मंडळ मनापासून स्वीकार करीत असल्याचे जोशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. पुण्यातील अनेक शिक्षणसंस्था महोत्सवास मनापासून आणि विनाअट मदत करण्यास तयार असल्याचेही चित्र यामुळे समोर आले. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी सुरू केलेला हा अभिाजात संगीताचा कार्यक्रम जागतिक पातळीवर वाखाणला गेला आणि रसिकांनी व हितचिंतकांनीही हा महोत्सव आपलाच असल्याचे अनेकदा जाहीरपणे सांगितले. जागाबदलाच्या निमित्ताने या सगळ्या भावनांची उजळणी झाली, असेही जोशी यांनी नमूद केले.

         महाराष्ट्रीय मंडळाशी भीमसेनजींचा दीर्घकाळ अतिशय निकटचा संबंध होता. मंडळाच्या विविध उपक्रमांत ते सहभागीही होत असत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रीय मंडळाचे सरचिटणीस धनंजय दामले यांनी आर्य संगीत प्रसारक मंडळास मुकुंदनगर येथील क्रीडा संकुलातील मैदान या महोत्सवासाठी देण्याचे अगत्याने मान्य केले, याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले आहेत. हा महोत्सव दरवर्षीप्रमाणेच दिमाखात आणि अभिजात संगीतातील अनेक नव्या जाणिवांसह यंदाही साजरा होईल आणि त्यासाठी गेली पासष्ट वर्षे रसिक, हितचिंतक आणि प्रायोजक यांच्याकडून जे सहकार्य मिळत आले, तसेच यापुढेही मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: The 66th Sawai Mahotsav will organised at Mukundnagar Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.