भाजपाचा एक नेता माझ्यामुळे संसदेत जाईल, त्यापेक्षा...; 'वंचित'च्या राहुल गायकवाडांनी अर्ज मागे घेतला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 04:10 PM2024-04-22T16:10:28+5:302024-04-22T16:52:33+5:30

Solapur Lok sabha: सोलापूरमध्ये लोकसभा निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस होता. या दिवशीच गायकवाड यांनी माघार घेतल्याने वंचितमध्ये खळबळ उडाली आहे. गायकवाड यांनी वंचितने उमेदवारी दिली परंतु कार्यकर्तेच सहकार्य करत नसल्याचा आरोप केला आहे. 

A BJP leader will go to Parliament because of me; Vanchit's Rahul Gaikwad gave two reasons Solapur Lok sabha | भाजपाचा एक नेता माझ्यामुळे संसदेत जाईल, त्यापेक्षा...; 'वंचित'च्या राहुल गायकवाडांनी अर्ज मागे घेतला

भाजपाचा एक नेता माझ्यामुळे संसदेत जाईल, त्यापेक्षा...; 'वंचित'च्या राहुल गायकवाडांनी अर्ज मागे घेतला

मविआसोबत लढण्याची तयारी करता करता वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र उमेदवार दिले आणि मविआची लढाई आणखी कठीण करून ठेवली. अशातच वंचितच्या काही उमेदवारांचे अर्ज रद्द झाले तर काहींनी माघारी घेतले आहेत. यात आता सोलापूरचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी दोन महत्वाची कारणे देत आपला उमेदवारी अर्ज अचानक मागे घेतला आहे. 

सोलापूरमध्ये लोकसभा निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस होता. या दिवशीच गायकवाड यांनी माघार घेतल्याने वंचितमध्ये खळबळ उडाली आहे. गायकवाड यांनी वंचितने उमेदवारी दिली परंतु कार्यकर्तेच सहकार्य करत नसल्याचा आरोप केला आहे. 

उमेदवारी जाहीर होताच मी गेल्या पंधरा दिवसांपासून सोलापूर जिल्हात आलेलो आहे. इथे मी सोलापूरच्या कार्यकारिणीशी भेट झाली. जनतेलाही भेटलो. गेल्या पंधरा दिवसांत मी खूप काही अनुभवले. आंबेडकरी चळवळ माझ्या डीएनएमध्ये आहे. परंतु इथे मी जे काही अनुभवले ती चळवळ नव्हती, अशी टीका गायकवाड यांनी केली आहे. 

सोलापूरमधील भोळी जनता आंबेडकर या एका नावासाठी भावनिक आहे. त्यांच्याबद्दल जनतेत आदर आहे. परंतु चळवळीसाठीची जी फळी लागते तीच इथे पोकळ असल्याचे मला जाणवले आहे. ही फळी पोषक नाही, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले. 

येथील कार्यकारणीचा स्वार्थ आजही तसाच आहे. मता त्यांच्यात बाबासाहेबांचे स्वप्न दिसत नाही. मी लढण्यासाठी उतरलो होतो, परंतु ती फळी पाहून वाटतेय की मला हातात बंदूक देऊन मैदानात सोडलेय, पण त्या बंदुकीत गोळ्या नसून छर्रे आहेत. या छर्र्यांच्या मदतीने मी युद्ध लढवून जिंकेन असे वाटत नाही, असे राहुल गायकवाड म्हणाले. 

अशा अर्धवट अवस्थेत लढलो तर भाजप कार्यकर्त्यांना मदत करतोय असे वाटतेय. भाजपाच्या उमेदवाराला मदत करतोय अशी भीती आहे. त्यांचा एक नेता संसदेत जाईल आणि संविधानाला धोका निर्माण होईल, असे काही घडू नये म्हणून उमेदवारी मागे घेत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. 
मी जर अर्धवट लढलो तर भाजपच्या कार्यकर्त्याला मदत करतोय, असं वाटतंय. भाजपच्या उमेदवाराला सोईचं वातावरण निर्माण होईल का, अशी मला भीती वाटत आहे. भाजपचा एक नेता माझ्यामुळे संसदेत जाईल. संविधानाला धोका निर्माण होईल, असं माझ्याकडून काही होऊ नये असे मला वाटतं, असं थेट स्पष्टीकरण राहुल गायकवाड यांनी दिलं.

Web Title: A BJP leader will go to Parliament because of me; Vanchit's Rahul Gaikwad gave two reasons Solapur Lok sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.