अजित पवारांच्या राजीनाम्याने शरद पवारांचा 'टेंपो' खाली आणला : छगन भुजबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 10:52 AM2019-10-13T10:52:17+5:302019-10-13T10:54:09+5:30

या मुलाखतीत भुजबळांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. त्यांनी शिवसेना आणि भाजपच्या दहा रुपये आणि पाच रुपये थाळीवरून सुरू असलेल्या जुगलबंदीवरही टीका केली. सेनेने याआधी आणलेला एक रुपयात वडापाव ही योजना त्यावेळी बारगळली होती, याची आठवणही त्यांनी करून दिली.

Ajit Pawar's resignation brought down Sharad Pawar's tempo: Chhagan Bhujbal Vidhan Sabha Election 2019 | अजित पवारांच्या राजीनाम्याने शरद पवारांचा 'टेंपो' खाली आणला : छगन भुजबळ

अजित पवारांच्या राजीनाम्याने शरद पवारांचा 'टेंपो' खाली आणला : छगन भुजबळ

Next

- राजा माने

येवला (नाशिक) - ईडीच्या संदर्भात शरद पवार यांनी पुकारलेल्या आंदोलनाने उच्च 'टेंपो' गाठला होता. अजित पवारांच्या राजीनाम्यान सगळा फोकस दुसरीकडे वळला आणि शरद पवारांनी आंदोलनाने उभा केलेला जनमानसाचा टेंपो खाली आला. अजित पवारांनी राजीनामा देण्याची काहीही गरज नव्हती पण तो त्यांनी दिला, असे उद्वीग्न उद्गार राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी लोकमतशी संवाद साधताना काढले.  छगन भुजबळ यांच्या नाशिक जिल्ह्यातील येवला या मतदार संघात त्यांची भेट घेतली.

- काय म्हणतंय येवला ? तुमचे सर्व विरोधक एकवटल्याने निवडणूक तुम्हाला जड चाललीय म्हणे !
भुजबळ
:अहो सोपी झालीय. कारण मतदारांना विकास आणि माझे काम कळते.

- पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्याच्या प्रचारापासून तुम्ही अलिप्त दिसता. तुम्हाला अलिप्त ठेवले आहे की, वेगळे काही कारण आहे.
भुजबळ
: नाशिक जिल्ह्यावर सध्या मी लक्ष केंद्रीत केले आहे.पक्षाचे 15 उमेदवार निवडून आणण्याच्या तयारीला मी लागलो आहे. त्यामुळे राज्यात अजुन फिरायला सुरुवात केलेली नाही. पण लवकरच करणार आहे.

- आघाडी सरकारने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना अटक करणे ही चूक होती व ती एका ज्येष्ठ नेत्याच्या दबावामुळे घडली, असे अजित पवार एका मुलाखतीत म्हणाले. ते ज्येष्ठ नेते तुम्हीच तर नाही ना ?
भुजबळ
- 1999 मध्ये ज्यावेळी आम्ही पक्षाच्या प्रचारासाठी उतरलो, त्यावेळी आमच्या वचननाम्यातच श्रीकृष्ण आयोगाने ज्या लोकांना दोषी ठरवले त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू असं होतं. 1995 मध्ये जेव्हा युतीचं सरकार होते, त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांविरुद्ध असलेल्या खटल्यांचा निपटारा करण्यात आला होता. परंतु, श्रीकृष्ण आयोगाची फाईल तशीच ठेवण्यात आली होती. ती फाईल माझ्यासमोर आली तेव्हा मी गृहमंत्री होतो. तेव्हा इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती माझी होती. त्यामुळे मला नाईलाजाने सही करावी लागली. मात्र हा मुद्दा आता संपल्याचे भुजबळ यांनी नमूद केले.

- राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपमध्ये गेले.तुम्ही देखील निघाल्याची चर्चा होती. तुम्ही गेला नाहीत. की त्यांनीच घेतले नाही ?
भुजबळ : ही सगळी चर्चा तुम्ही मीडियावाल्यांनी घडवून आणली. बाकी मी आहे तिथंच आहे.

- सुशीलकुमार शिंदे सारखा ज्येष्ठ काँग्रेसनेता राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण व्हावे अशी भावना व्यक्त करतो.तुमची काय भावना आहे. ?
भुजबळ
: आज त्या विषयला महत्त्व नाही. अजित पवारांचा राजीनामा असले नाही तर विलिनीकरणाचा विषय विरोधी पक्षाचा फोकस बदलण्याचा प्रयत्न सतत काही मंडळी करताहेत.

- शरद पवारांसारख नेता वन मॅन आर्मी शैलीत राज्यभर फिरतोय.  बाकी नेत्यांचे काय ?
भुजबळ
- नाशिक जिल्ह्यात 15 मतदारसंघ असून त्यापैकी 10 राष्ट्रवादीला आणि पाच काँग्रेसला सुटलेले आहेत. 15 पैकी किमान आघाडी 12 आमदार निवडून आणण्याची जबाबदारी आपण घेतली आहे. शेवटी आमदार निवडून आणणे महत्त्वाचे असून या 15 आमदारांचा आपण प्रचार करत असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले. तसेच 14 ऑक्टोबरला महाराष्ट्रातील कर्जत, वैजापूर या मतदार संघात जाणार असल्याचे ते म्हणाले.

- शरद पवारांवर ईडीने गुन्हा दाखल केला तर अजित पवारांनी राजीनामा दिला. तुम्ही संकटात असताना तुमच्या मदतीला पक्षाचे कोण आले ?
भुजबळ
: राष्ट्रवादी पक्ष माझ्या पाठिमागे खंबीरपणे उभा राहिला. शरद पवार आणि आम्ही सर्वजण पक्ष बांधणीसाठी सतत कार्यरत राहूच.

- राज ठाकरे प्रबळ विरोधी पक्ष म्हणून निवडून द्या म्हणतात मग विरोधी पक्षाची राष्टर्वादीची संधी जाणारच म्हणायचं का ?
भुजबळ
: हो राष्ट्रवादीचं सरकार येणार आहे. त्यामुळे विरोधात बसायचा प्रश्नच नाही.

या मुलाखतीत भुजबळांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. त्यांनी शिवसेना आणि भाजपच्या  दहा रुपये आणि पाच रुपये थाळीवरून सुरू असलेल्या जुगलबंदीवरही टीका केली. सेनेने याआधी आणलेला एक रुपयात वडापाव ही योजना त्यावेळी बारगळली होती, याची आठवणही त्यांनी करून दिली.

येवल्यात केलेल्या विकासाच्या मॉडेलसंदर्भात भुजबळ यांनी सांगितले की, 15 वर्षांपूर्वी नाशिकहून येवल्याला येण्यासाठी तीन तास लागत होते. परंतु, सध्या दीड तास लागतो. आताच्या सरकारने अनेक ठिकाणी खड्डे करून ठेवले आहेत. तरी दीड तासात आपण कसबस पोहोचतो. आमच्या सरकारच्या काळात मतदार संघातील रस्त्यांवर लहान मुलांच्या सुरक्षेसाठी विशेष काळजी घेतली गेली, बोट क्लब, अहिल्या होळकर घाट, महात्मा फुले नाट्यगृह, तात्या टोपे पुतळा, क्रीडा संकुल, 100 खाटांचे रुग्णालय, मुक्तीभूमी येवल्यात उभारण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, गौतम बुद्धांची मुर्ती येथेच आहे. तर 17 एकरमध्ये सर्व सरकारी कार्यालये आम्ही आणली. संपूर्ण देशात ही अभिनव कल्पना आम्ही येवल्यात प्रत्येक्षात उतरवल्या भुजबळ यांनी सांगितले.  

येवला मतदार संघात पैठणी केंद्र असून पैठणी विकण्याची सोय आम्ही केली आहे. ग्रामीण भागातील अंगवाड्यांसाठी काम केले. हे काम संपूर्ण नाशकात केले. पाण्याची सोय करण्यासाठी एवढे बंधारे बांधले की, आता बंधारा बांधण्यासाठी जागा शिल्लक नाही. गुजरातला जाणारे पाणी आपल्याकडे आणण्यासाठी 10 बंधारे आणि एक बोगदा बांधला. त्यामुळे 175 किमीचा प्रवास करून पाणी येवल्यात दाखल झाले आहे. हे काम महाराष्ट्रासाठी दिशादर्शक ठरणारे किंबहुना अशा कामामुळे मराठावाड्याचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो, असंही भुजबळ यांनी सांगितले.

 

Web Title: Ajit Pawar's resignation brought down Sharad Pawar's tempo: Chhagan Bhujbal Vidhan Sabha Election 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.