नीरा पाणलोट क्षेत्रातील सर्व धरणे भरली, अनेक ठिकाणी जनजीवन झाले विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 12:54 AM2017-09-21T00:54:49+5:302017-09-21T00:54:50+5:30

नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत.

All the dams in the Neerar catchment area were filled with disrupted life in many places | नीरा पाणलोट क्षेत्रातील सर्व धरणे भरली, अनेक ठिकाणी जनजीवन झाले विस्कळीत

नीरा पाणलोट क्षेत्रातील सर्व धरणे भरली, अनेक ठिकाणी जनजीवन झाले विस्कळीत

Next

नीरा : नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत. नीरा नदीवरील वीर धरणात नीरा-देवघर, भाटघर, गुंजवणी या धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाणी येत आहे. त्यामुळे वीर धरण शंभर टक्के भरल्याने तीन दरवाजे चार फुटांवर उचलून १४,००० क्युसेक्स वेगाने नीरा नदीत पाणी सोडले जात आहे.
नऊ टीएमसी क्षमता असलेले वीर धरण मागील चार-पाच दिवसांत शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकरी सुखावला आहे. धरण लाभक्षेत्रात जुलै, आॅगस्ट महिन्यात पाऊस झाला नव्हता तरी मोठ्या आशेवर ऊसलागवडी झाल्या; मात्र शेतकरी धास्तावला होता. आज रोजी सर्व धरणे शंभर टक्के भरून वाहू लागल्याने ऊसउत्पादक शेतकरी सुखावला आहे.
या आठवड्यात वीर धरणातून थोड्याफार प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. मंगळवारी सकाळी १३,००० क्युसेक्स वेगाने, तर संध्याकाळी १४,१११ क्युसेक्स वेगाने नीरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. बुधवारी सकाळी नीरा-देवघर धरणातून २,९३४ क्युसेक्स, भाटघर धरणातून २,१६७ क्युुसेक्स तर वीर धरणातून १४,१११ क्युसेक्स वेगाने दिवसभर पाणी सोडण्यात आले.
पुणे व सातारा या जिल्ह्याच्या सीमेवर असणाºया वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेली भाटघर, नीरा-देवघर, गुंजवणी ही सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत. या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे वीर धरणात येणाºया पाण्याची आवक वाढल्यावर वीर धरणातून वारंवार नीरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
>नीरा देवघर १०० टक्के भरले
वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आजअखेर एकूण ३४३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी ३ मिलिमीटर इतका पाऊस झाला असून हे धरण १०० टक्के भरले आहे. तर, नीरा-देवघर धरणदेखील १०० टक्के भरले असून मंगळवारी या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १५ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
आज अखेर एकूण २,०१७ मिलिमीटर पाऊस या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झाला आहे. तर, भाटघर धरणदेखील आॅगस्ट महिन्यातच १०० टक्के भरले असून भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी ८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. आजअखेर एकूण ६४२ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. वीर धरणातून गेल्या आठवड्यामध्ये ३ वेळा पाण्याचा विसर्ग नीरा नदीत करण्यात आला असून, वीर धरणात येणाºया पाण्याची आवक बंद झाली.

Web Title: All the dams in the Neerar catchment area were filled with disrupted life in many places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.