सर्व गिरणी कामगारांना घरे मिळणार - मुख्यमंत्र्यांची घोषणा

By admin | Published: May 10, 2016 04:14 AM2016-05-10T04:14:39+5:302016-05-10T04:14:39+5:30

एकही गिरणी कामगार घरापासून वंचित राहणार नाही. मुंबईचा नवा विकास आराखडा येत असून, त्यात परवडणाऱ्या घरांसाठी अधिक जागा आरक्षित करण्यात आली आहे.

All mill workers will get homes - Chief Minister's announcement | सर्व गिरणी कामगारांना घरे मिळणार - मुख्यमंत्र्यांची घोषणा

सर्व गिरणी कामगारांना घरे मिळणार - मुख्यमंत्र्यांची घोषणा

Next

मुंबई : एकही गिरणी कामगार घरापासून वंचित राहणार नाही. मुंबईचा नवा विकास आराखडा येत असून, त्यात परवडणाऱ्या घरांसाठी अधिक जागा आरक्षित करण्यात आली आहे. या परवडणाऱ्या घरांमध्ये मोठा वाटा गिरणी कामगारांना मिळेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली.
वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सोमवारी गिरणी कामगारांच्या २ हजार ६३४ घरांची सोडत काढण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. आॅगस्टमध्ये गिरणी कामगारांसाठी एमएमआरडीएच्या २ हजार ४१८ घरांची लॉटरी काढण्याची घोषणा करून मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई महानगर क्षेत्रात विविध ठिकाणी ११ लाख घरे बांधण्याचे नियोजन सरकारने केले आहे. या नियोजनात गिरणी कामगारांना प्रमुख स्थान दिले जाईल. गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता म्हणाले की, आघाडी सरकारने १५ वर्षांत ६ हजार घरांचे वाटप केले. याउलट युती सरकारने अवघ्या दोन ) वर्षांमध्ये सुमारे पाच हजार घरे देण्याची वचनपूर्ती केली आहे. आॅगस्टमध्ये लॉटरी काढण्यात येणाऱ्या एमएमआरडीएच्या घरांची किंमत ६ लाख रुपये इतकी ठरवण्यात आली आहे. गिरणी कामगारांच्या कृती समितीसोबत चर्चा करून ही किंमत ठरवण्यात आल्याने कामगार नाराज होण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईकरांसाठी जूनमध्ये
९७० घरांची सोडत
मुंबईकरांना प्रतीक्षा असलेल्या स्वस्त घरांची सोडत जूनमध्ये काढण्याची घोषणा महेता यांनी यावेळी केली आहे. या सोडतीची जाहिरात येत्या आठ ते १० दिवसांत प्रकाशित करण्यात येईल. त्यात एकूण ९७० घरांसाठी मुंबईकरांना अर्ज करता येईल, असेही त्यांनी सांगितले.
................................
भाजपाचा वरचष्मा
रंगशारदा सभागृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत प्रकाश महेता, मुंबई उपनगराचे पालकमंत्री विनोद तावडे, खासदार पूनम महाजन, भाजपाचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार अशी दिग्गज मंडळी उपस्थित होती. याउलट शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे व्यतिरिक्त कोणताही बडा नेता याठिकाणी दिसला नाही. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सर्व प्रमुख पाहुणे गेल्यावर सभागृहात हजेरी लावली. तर गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याची चर्चा होती.

Web Title: All mill workers will get homes - Chief Minister's announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.