राष्ट्रवादी लोकसभा जाहिरनामा समिती जाहीर, दिलीप वळसे पाटील यांनी अध्यक्षपदी नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 04:33 PM2019-01-14T16:33:15+5:302019-01-14T16:34:07+5:30
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जाहिरनामा समिती स्थापन केली असून या समितीच्या अध्यक्षपदी माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची निवड करण्यात आली.
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जाहिरनामा समिती स्थापन केली असून या समितीच्या अध्यक्षपदी माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची निवड करण्यात आली असून या समितीमध्ये २२ सदस्यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसने आज लोकसभेसाठी जाहिरनामा समितीची घोषणा केली आहे. या समितीमध्ये सदस्य म्हणून आमदार भास्करराव जाधव, ज्येष्ठ नेते अण्णा डांगे, खासदार सुप्रियाताई सुळे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, आमदार राजेश टोपे, अनिल देशमुख, राजेंद्र शिंगणे, खासदार वंदना चव्हाण, आमदार विदया चव्हाण, माजी आमदार जयदेव गायकवाड, युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफार मलिक,डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ.विक्रम काळे, विदयार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, युवती प्रदेशाध्यक्षा कुमारी सक्षणा सलगर, प्रदेश प्रवक्ते भूषण राऊत यांचा समावेश आहे.