अष्टविनायक दर्शन २४ तासांत
By Admin | Published: August 13, 2015 02:55 AM2015-08-13T02:55:18+5:302015-08-13T02:55:18+5:30
राज्यातील अष्टविनायकांचे दर्शन घेण्यासाठी सध्या मोटारीने जायचे तर ४८ तास लागतात, हा अवधी निम्म्यावर आणण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पाऊल उचलले आहे.
मुंबई : राज्यातील अष्टविनायकांचे दर्शन घेण्यासाठी सध्या मोटारीने जायचे तर ४८ तास लागतात, हा
अवधी निम्म्यावर आणण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पाऊल उचलले आहे.
अष्टविनायकांना जोडणाऱ्या ६६० किलोमीटरच्या रस्त्याचे रुंदीकरण, दुरुस्ती, मजबुतीकरण यावर १८१
कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्याचा पहिला टप्पा म्हणून मोरगाव ते सिद्धटेकदरम्यानच्या रस्त्यासाठी ५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ६६० किलोमीटरच्या मार्गाचे वरील काम एक वर्षाच्या आत पूर्ण केले जाणार आहे. या मार्गावर कुठेही टोल आकारणी केली जाणार नाही. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, या कामामुळे गणपती भक्तांचा वेळ वाचू शकेल, तसेच पर्यटक व भाविकांचा ओघही वाढेल. (विशेष प्रतिनिधी)