यू-ट्युबवर पाहून बनविले एटीएम कार्ड, आरोपी बिस्वासची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 05:39 AM2017-12-31T05:39:48+5:302017-12-31T05:40:02+5:30

बनावट एटीएम कार्ड बनवून फसवणूक करणाºया टोळीतील मुख्य आरोपी हरिदास हरविलास बिस्वास (२९, रा.जि. मलकानगिरी, ओडिशा) याने यू-ट्युबवरील व्हिडीओ पाहून बनावट एटीएम कार्ड बनविल्याचे उघडकीस आले आहे.

 ATM card, accused Biswas confessed about U-tub | यू-ट्युबवर पाहून बनविले एटीएम कार्ड, आरोपी बिस्वासची कबुली

यू-ट्युबवर पाहून बनविले एटीएम कार्ड, आरोपी बिस्वासची कबुली

googlenewsNext

अमरावती : बनावट एटीएम कार्ड बनवून फसवणूक करणा-या टोळीतील मुख्य आरोपी हरिदास हरविलास बिस्वास (२९, रा.जि. मलकानगिरी, ओडिशा) याने यू-ट्युबवरील व्हिडीओ पाहून बनावट एटीएम कार्ड बनविल्याचे उघडकीस आले आहे.
अमरावती पोलिसांनी बिस्वास याच्यासह विशाल तुळशीराम उमरे (३४, रा. वरोरा, चंद्रपूर) व किसन लालचंद यादव (३०, रा. गाजीपूर, दिल्ली) या तिघांना प्रॉडक्शन वाँरटवर ताब्यात घेऊन चंद्रपूरहून शनिवारी अमरावतीत आणले. यावेळी बिस्वास यानेच ही पोलिसांकडे तशी कबुली दिली.
बँक खातेदारांच्या खात्यातून परस्पर पैसे चोरणा-या टोळीतील परितोष पोतदार याला अमरावती पोलिसांनी दिल्लीतून अटक केली. चंद्रपूर पोलिसांनीही या टोळीतील तिघांना अटक केली. अमरावती जिल्ह्यात घडलेल्या २३ गुन्ह्यांत या आरोपींची चौकशी सुरूआहे. हरिदास बिस्वासने पोलिसांकडे फसवणुकीचा फंडा उघड केला. दिल्लीत एमबीएचे शिक्षण घेत असताना त्याने इंटरनेटच्या माध्यमातून यू-ट्युबवर एटीएम क्लोनिंगचे व्हिडीओ पाहिले. त्यानेही बनावट एटीएम कार्ड बनविण्याचा बेत आखला. यासाठी अन्य सहकारी आरोपींना विविध राज्यांमध्ये एटीएमधारकांचा डेटा चोरण्यास पाठविले. विशाल उमरे हा विदर्भातील विविध एटीएममध्ये जाऊन ग्राहकांच्या मागे उभा राहून एटीएमचा १६ अंकी क्रमांक व पीन हेरायचा व लगेच मोबाइलवर टाइप करून दिल्लीत बसलेल्या बिस्वासला पाठवायचा. अशाप्रकारे देशभरातील अनेक बँक खात्यातून लाखो रूपये चोरले़

नोएडा, गुडगाव येथील एटीएमचा वापर

बिस्वास ब्लँक एटीएम कार्ड मार्केटमधून विकत घेऊन लॅपटॉप व एनकाऊन्टर कार्ड रायटर या मशीनद्वारा खातेदारांचे बनावट एटीएम कार्ड तयार करायचा. हे कार्ड किसनलाल यादवकडे पाठवून नोएडा, गुडगाव येथील एटीएममधून पैसे काढण्यासाठी पाठवायचा.

Web Title:  ATM card, accused Biswas confessed about U-tub

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.