पुढील वर्षापासून ई-बुक, ब्लॉग लेखन करणा-यांनाही पुरस्कार : विनोद तावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 02:47 AM2018-02-28T02:47:39+5:302018-02-28T02:47:39+5:30

शासनाच्या वतीने आतापर्यंत पुस्तक, ग्रंथांना पुरस्कार दिले जात होते, पुढील वर्षापासून ई-बुक आणि ब्लॉग लेखन करणाºयांनाही पुरस्कार देण्यात येतील, असे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केले.

Award for e-book, blog writers from next year - Vinod Tawde | पुढील वर्षापासून ई-बुक, ब्लॉग लेखन करणा-यांनाही पुरस्कार : विनोद तावडे

पुढील वर्षापासून ई-बुक, ब्लॉग लेखन करणा-यांनाही पुरस्कार : विनोद तावडे

Next

मुंबई : शासनाच्या वतीने आतापर्यंत पुस्तक, ग्रंथांना पुरस्कार दिले जात होते, पुढील वर्षापासून ई-बुक आणि ब्लॉग लेखन करणाºयांनाही पुरस्कार देण्यात येतील, असे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केले.
नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे मंगळवारी मराठी भाषा गौरव दिनी विविध साहित्यिकांना विविध वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्यात आले. या वेळी विनोद तावडे बोलत होते. याप्रसंगी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्यासह आमदार गणपतराव देशमुख, भाई गिरकर, आशिष देशमुख उपस्थित होते.
यंदाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांना, श्री पु. भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार पुणे येथील वरदा प्रकाशन यांना, डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार अविनाश बिनीवाले यांना आणि कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार मराठी विज्ञान परिषद या संस्थेला प्रदान करण्यात आला. राम नाईक यांना राज्य शासनाच्या वतीने ‘लक्ष्मीबाई टिळक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये, मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या वेळी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या १८ दर्जेदार पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. विविध साहित्य प्रकारांतील ३५ राज्य वाङ्मय पुरस्कार या वेळी प्रदान करण्यात आले. राहुल कोसंबी, ल.म. कडू, सुजाता देशमुख आणि श्रीकांत देशमुख या साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त मराठी साहित्यिकांचाही सन्मान करण्यात आला.
व्यापक प्रमाणात साजरा करणार-
भारतातील पहिले पुस्तकांचे गाव भिलार येथे तयार करण्यात आले असून आगामी काळात हे गाव प्रकाशक, लेखकांसाठी पुस्तक प्रकाशनाचे महत्त्वाचे केंद्र ठरेल. येत्या काळात पुस्तकांच्या गावी विविध साहित्यिकांचे महोत्सव आयोजित करून मराठी भाषा दिन अधिक व्यापक प्रमाणात साजरा करू. पहिली ते दहावी इयत्तेच्या अभ्यासक्रमात मराठी सक्तीचे करण्याच्या सूचना अभ्यासक्रम मंडळाला राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणार आहेत. - विनोद तावडे, सांस्कृतिक मंत्री
मी मराठीत लिहिलेल्या ‘चरैवैती चरैवैती’ या पुस्तकाचा सहा भाषांमध्ये अनुवाद होत आहे. २६ मार्च रोजी संस्कृत भाषेतील अनुवादित पुस्तकाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे. ‘चरैवैती-चरैवैती’ या शब्दाचा अर्थ ‘चालत राहा, चालत राहा’ असा असून याप्रमाणे मी माझा लेखन प्रवास सुरू ठेवला आहे. - राम नाईक, राज्यपाल, उत्तर प्रदेश

Web Title: Award for e-book, blog writers from next year - Vinod Tawde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.