प्रतिभाशाली कलावंताचे अपंग हात साकारताहेत सुंदर गणोशमूर्ती
By admin | Published: August 4, 2014 11:19 PM2014-08-04T23:19:15+5:302014-08-04T23:19:15+5:30
कोणतीही कला ही त्या कलाकाराच्या अंतरात्म्याच्या प्रतीभेचा आविष्कार असते. कलाकाराला कला व्यक्त करण्यासाठी आपल्या शारीरिक क्षमतांची गरज पडत असते.
Next
बारामती : कोणतीही कला ही त्या कलाकाराच्या अंतरात्म्याच्या प्रतीभेचा आविष्कार असते. कलाकाराला कला व्यक्त करण्यासाठी आपल्या शारीरिक क्षमतांची गरज पडत असते. परंतु, कोणी जन्मजात जर अपंग असेल तर.. परंतु आपल्या कलेवर त्याची निस्मिम श्रद्धा असणा:या कलाकाराला आपण काय म्हणू.. एक तर त्याच्यावर खास विद्येची देवता सरस्वतीची कृपा असली पाहिजे किंवा अविरत कष्टांनी त्या कलाकाराने आपल्या कलेवर प्रभुत्व तरी मिळवले असले पाहिजे.
असाच एक अपंग कलाकार बारामती तालुक्यातील गुणवडी गावात राहतो. मनोज कुंभार हे त्यांचे नाव. मनोज यांच्या घरामध्ये परंपरागत गणोशमूर्ती बनविण्याचा व्यवसाय आहे. जन्मताच हाताला बोटे नसताना कोणत्याही साच्याचा वापर न करता मनोज यांना सुंदर गणोश मूर्ती घडविताना पाहणो म्हणजे पाहणाराला एक विलक्षण अनुभवच असतो.
मनोज यांना हाताला बोटे नाहीत. परंतु, त्या अधू हातातून निर्माण होणारी एक एक कलाकृती हातीपायी धडधाकट असणा:या सामान्य माणसाला अचंबित केल्याशिवाय राहत नाही.
भोर येथील विद्याप्रतिष्ठान संस्थेच्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये कला शिक्षक असणा:या मनोज यांनी एटीडी, सीटीसी असे अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. तसेच, ‘मॉडर्न आर्ट’मध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे. लहानपणापासूनच कलेची आवड असणा:या मनोज यांच्या घरात गणोशोत्सवादरम्यान गणोशमूर्ती बनवण्याचा व्यवसाय आहे. आपल्या या परंपरागत व्यवसायात आई आणि वडिलांच्या मदतीने मनोज विविध प्रकारच्या गणोशमूर्ती कोणत्याही साच्याचा उपयोग न करता ‘हातानेच’ बनवितात. गणोशमूर्ती बनविताना मातीवर लिलया फिरणारा त्यांचा अधू हात जेव्हा सुंदर गणोशमूर्ती घडवितो तेव्हा पाहणा:याला आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही. यामधून इकोफ्रेंडली गणोशमूर्ती बनविल्याने पर्यावरणपूरक गणोशोत्सवास प्रधान्य मिळेल, असेही मनोज यांना वाटते.
4कला शिक्षक असणा:या मनोज कुंभार यांनी ‘मॉडर्न आर्ट’ या कलाप्रकारामध्ये विशेष प्रावीण्य मिळवले आहे. हाताला बोटे नसतानाही चित्रकलेच्या क्षेत्रमध्ये त्यांनी मिळवलेले हे यश परिसरामध्ये कौतुकाचा तर विषय आहेच, परंतु त्याहीपेक्षा परिसरात राहणा:या रहिवाशांसाठी तो एक अभिमानाचाही विषय आहे. आतार्पयत अनेक सामाजिक संस्थांनी मनोज यांना विविध पुरस्कारांनी गौरविले आहे. औरंगाबाद येथील कलाभारती संस्थेचा 2क्क्4 चा कलारत्न, मनोबल बालविकास प्रतिष्ठानचा 2क्क्4 चा कलाभूषण पुरस्कार त्यांना आतार्पयत प्राप्त झाले आहेत.
4विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आजर्पयत मनोज यांनी पर्यावरण पुरक (इकोफ्रेंडली) गणोशमूर्तीसाठी कार्यशाळा घेतल्या आहेत. या वेळी मनोज यांनी बोलताना सांगितले, की विविध खासगी शाळांमध्ये सातत्याने पर्यावरण पुरक उपक्रम राबविले जातात. मात्र, त्यामानाने जिल्हा परिषद शाळांमध्ये असे उपक्रम होताना दिसत नाहीत. त्यासाठी मी स्वत: पुढाकार घेऊन असे उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्नशील आहे. माङया या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसादही मिळतो, त्यामुळे गणोशोत्सव जास्तीत जास्त पर्यावरणपूरक कसा होईल आणि आपण त्याचा निखळ आनंद कसा मिळवू, हे पाहिले पाहीजे. विद्याथ्र्यामध्ये पर्यावरणपूरक गणोशोत्सवाबद्दल जागृती आणि आवड निर्माण होण्यासाठी असे उपक्रम या दिवसांमध्ये राबविले जावेत, असेही मनोज यांनी या वेळी सांगितले.