मरावाड्याचे ग्रंथवैभव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ग्रंथालय
By Admin | Published: March 28, 2017 05:17 PM2017-03-28T17:17:47+5:302017-03-28T17:17:47+5:30
गेल्या सहा दशकांपासून मराठवाड्याचे ग्रंथवैभव म्हणून अस्तित्त्वात असलेले ह्यडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ग्रंथालय म्हणजे सर्वात मोठा ज्ञानस्त्रोत
मयूर देवकर
औरंगाबाद, दि. 28 : गेल्या सहा दशकांपासून मराठवाड्याचे ग्रंथवैभव म्हणून अस्तित्त्वात असलेले ह्यडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ग्रंथालय म्हणजे सर्वात मोठा ज्ञानस्त्रोत. दुर्मिळ ग्रंथापासून ते आता डिजिटायझेशनपर्यंत सर्वच आघाड्यावर या ग्रंथलयाचा नावलौकिक आहे. मराठवाड्याच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक विकासामध्ये विद्यापीठ ग्रंथालयाचे मोठे योगदान आहे. मराठाड्याला मोठी एतिहासिक परंपरा लाभलेली आहे. तिचे जतन करणारे व साक्ष म्हणून अस्तित्त्वात असलेले ग्रंथ, वास्तू, ताम्रपट, हस्तलिखिते येथे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून संशोधक, इतिहासप्रेमी आणि साहित्यप्रेमींसाठी जणुकाही तो खजिनाच आहे.
ग्रंथालयाचे संचालक डॉ. धर्मराज वीर म्हणतात की, ह्यगं्रथसंख्या, संग्रह आणि सुविधेच्या बाबतीत विद्यापीठ ग्रंथालय सुसज्ज तर आहेच विद्यार्थीकेंद्रित सर्व प्रक्रिया ठेवण्याकडे प्रशासनाचा कटाक्ष असतो. सांस्कृतिक व औद्योगिक प्रगती साधल्यानंतर मराठवाडा शैक्षणिकदृष्ट्या मागास राहू नये, येथील विद्यार्थ्यांना जागतिक दर््जाचे ज्ञानभांडार उपलब्ध करून द्यावे अशी आमची भूमिका आहे.
इतिहास
विद्यापीठाच्या स्थापनेच्या काही महिन्यांनंतर १९५८ साली ह्यडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ग्रंथालयह्ण सुरू झाले. पहिले ग्रंथपाल म्हणून एन. ए. गोरे यांची नियुक्ती करण्यात आली. ते पूर्वी ह्यएशियाटिक सोसायटी बॉम्बे लायब्ररीह्णचे ग्रंथपाल होते. सुरूवातील सामाजिक शास्त्रे, इतिहास, धर्म, तत्त्वज्ञान आणि कला विषयातील केवळ ४००५ पुस्तकांचा संग्रह होता. त्यामध्ये पुस्तकदात्यांचे योगदान खूप मोठे होते. युजीसी आणि पुस्तकपे्रमी व संग्रहकांनी केलेल्या मदतीमुळे विद्यापीठाची ग्रंथसंख्या वाढली. त्यामध्ये प्रामुख्याने डी. बी. कामत, ई. ए. वाडिया, जे. आर. बिल्लीमोरिया, कुमारी आर्मी बी. रुस्तमजी, ए. एन. महाता यांचे नावे घ्यावे लागेल. मुंबई विद्यापीठाचे ग्रंथपाल डॉ. डी. एन. मार्शल यांनी वर उल्लेख केलेले अनेक दाते शोधून दिले.
पुढे १९५९-६० या शैक्षणिक वर्षात काही विषयांत पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केल्यावर मराठी, इंग्लिश, साहित्य, अर्थशास्त्र, वित्त, बँकिंग, इतिहास आणि राजकारण या विषयाची दोन हजारपेक्षा जास्त पुस्तके विकत घेण्यात आली. या काळापर्यंत विद्यापीठाने एकूण दीड कोटीं रुपयांचे ग्रंथ विकत घेतले होते. विशेष अनुदानानुसार हैदराबादचा शामराज बहादूर यांच्या वैयक्तिक संग्राहलयातील सुमारे ४४ हजार ग्रंथ त्यांच्या सागवानी कपाटांसह विद्यापीठाला मिळाले. याच संग्रहामध्ये विद्यापीठाला दुर्मिळ अशी १६३८, १६६५ आणि १६८१ मध्ये प्रकाशित झालेली पुस्तके मिळाली.
अमूल्य संग्रह
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ग्रंथालयाचे वैशिष्ट्ये म्हणजे दुर्मिळ ग्रंथांचा खजिना. पंधराव्या शतकाती पुस्तकांपासून ते केवळ एकच प्रत उरलेल्या अनेक एतिहासिक ग्रंथाचा संग्रह येथे आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ओमार खय्याम यांच्या रुबैयतची सचित्र आवृत्ती, भगवद्गीतेसंबंधी विविध साहित्याचे ३८०पेक्षा जास्त खंड, ह्यबुद्धिस्ट केव्ह - टेम्पल्स आॅफ अजंताह्ण (१८९६) हा जॉन ग्रिफिथ लिखित द्विखंडीय ग्रंथ, लोकमान्य टिकळ आणि जॉन मिल्टन यांसारख्या विभूतींच्या हस्ताक्षरातील ग्रंथ-कागदपत्र, सहा भाषांतून लिहिलेली हजारापेंक्षा जास्त पोथी हस्तलिखिते, मायक्रोफिल्मच्या स्वरुपात दीडशे वर्षांपेक्षा जास्त जुने जनगणना अहवाल, डबीत मावणारे सचित्र रामायण व महाभारत अशी गं्रथसंपदा आहे. याबरोबरच प्राचीन ताम्रपट, भांडी, वस्तू, जगभरातील दुर्मिळ अशा २६ खडकांचे नमुनेदेखील विद्यापीठाच्या संग्रहात आहेत. आजमितीला ३ लाख ७५ हजारांपेक्षा जास्त ग्रंथसंख्या आहे. त्यासोबतच मासिके, नियतकालिके यांचा मोठा संग्रह आहे.
डिजिटायझेनशन
बदलत्या काळानुसार ग्रंथालयाची संकल्पना आणि व्याप्ती बदलली आहे. माहिती व तंत्रज्ञानाच्या विकासामुळे ग्रंथालये आता ज्ञान व माहितीची के्रंदे म्हणून उदयास येत आहेत. गं्रथालयांचे डिजिटायझेशन करणे अनिवार्य आणि काळाचे पाऊल ओळखून केलेली योग्य तरतूद आहे. याबाबती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ग्रंथालयाने मोठी आघाडी घेतलेली आहे. १९५८ ते २०१७ पर्यंतचे पी. एचडीचे सर्व शोधप्रबंधांचे डिजिटायझेशन करण्यात आलेले असून इंटरनेटवर ते उपलब्ध आहेत. आतापर्यंत एकूण १२ लाख पृष्ठांचे स्कॅनिंग पूर्ण झालेले आहे. ह्यशोधगंगाह्ण या आॅनलाईन पोर्टलवर देशातील विद्यापीठांना शोधप्रबंध आॅनलाईन उपलब्ध करून देणे बंधंनकारक आहे. त्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा देशातून पाचवा क्रमांक लागतो.
त्याचबरोबर स्वयंचलित सीडी-डीव्हीडी लायब्ररी, विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र ५०० आसनक्षमतेचे अभ्यासकेंद्र (वाचन कक्ष), पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी ९० संगणकांसह अद्ययावत स्टडी लॅब, पी. एचडीसाठी ३० संगणक व स्वतंत्र रिसर्च क्युबिकल असलेले ई-ग्रंथालय, त्याचबरोबर देशाविदेशातील १५ हजारांपेक्षा जास्त नियतकालिके व जर्नलची आॅनलाईन सुविधा उपलब्ध आहे. त्याचा लाभ विद्यापीठासह संलग्नित कॉलेजेसचे प्राध्यापकही घेऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र ५०० आसनक्षेतेची रिडिंग रुम (वाचन कक्ष). तसेच स्पर्धा परीक्षषांशी निगडित नियतकालिके, मासिके, जर्नल, संदर्भ ग्रंथ विद्यार्थ्यांच्या शिफारशीनुसार उपलब्ध करण्यात येतात.