शिवसेनेला सोबत घेऊनच निवडणूक लढणार, रावसाहेब दानवेंकडून युतीचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 05:39 PM2018-10-29T17:39:31+5:302018-10-29T17:44:58+5:30

भाजपा लोकसभा व विधानसभा निवडणूक ही विकासाच्या मुद्यावर आणि शिवसेनेला सोबत घेऊनच लढविणार असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

BJP & Shiv Sena will contest election with Alliance - Raosaheb Demon | शिवसेनेला सोबत घेऊनच निवडणूक लढणार, रावसाहेब दानवेंकडून युतीचे संकेत

शिवसेनेला सोबत घेऊनच निवडणूक लढणार, रावसाहेब दानवेंकडून युतीचे संकेत

 अमरावती - नशिबावर कोणताच पक्ष निवडणूक जिंकू शकत नाही. ज्या पक्षाजवळ संघटन त्यांचीच सरशी होण्याचा हा काळ आहे. पक्षाद्वारे राज्यात मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाल्याने भाजपा लोकसभा व विधानसभा निवडणूक ही विकासाच्या मुद्यावर आणि शिवसेनेला सोबत घेऊनच लढविणार असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर २७ आॅक्टोबरपासून ४८ मतदारसंघात कार्यकर्त्यांना कामाला लावायला लावण्यासाठी जिल्हानिहाय दौरा सुरू असल्याचे दानवे यांनी सांगितले. लाट होती म्हणून पराभव झाल्याचे विरोधक सांगत असले तरी राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपच राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात, देशात सत्ता असली की पक्षसंघटनेकडे दुर्लक्ष होते. मात्र, भाजपाची संघटनात्मक वाटचालदेखील तेवढ्याच सक्षमपणे सुरू असल्याचे दानवे म्हणाले. विधानसभेसाठी २८८ विस्तारक पूर्णवेळ काम करीत आहेत. याव्यतिरीक्त ४८ विस्तारक स्थानिकांशी चर्चा करीत आहेत. यापैकी ८८ हजार बुथपर्यंत आम्ही वॉररूमच्या माध्यमातून पोहोचलो असल्याचे दानवे म्हणाले. पत्रपरिषदेला आ. अरूण अडसड, आ. सुनील देशमुख, आ, अनिल बोंडे, आ. रमेश बुंदेले, आ. प्रभुदास भिलावेकर, आ, रामदास आंबटकर, प्रदेश सचिव निवेदिता चौधरी (दिघडे), प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष जयंत डेहनकर आदी उपस्थित होते.

 दिवाळीनंतर नाफेडची खरेदी सुरू
 युतीची चर्चा झाली नसली तरी मित्रपक्ष शिवसेना सोबतच राहावी, असा आमचा प्रयत्न आहे. अमरावती येथे संघटनात्मक आढावा घेत आहो. आमचे काम वाढले तरी युती झाल्यास याचा मित्रपक्षालाच फायदा होईल. कर्जमाफीसाठी व्यक्ती हा घटक गृहीत न धरता कुटुंब हा घटक गृहीत धरण्यात येत असल्याने अधिकाधिक शेतक-यांना याचा लाभ होणार आहे. ९९ लाख शेतकºयांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी देण्यात आली आहे. दिवाळी पश्चात सोयाबीनची नाफेड खरेदी सुरू करण्यात येणार असल्याची ग्वाही, रावसाहेब दानवे यांनी दिली.

 अमरावतीचा उमेदवार संसदीय बोर्ड ठरविणार
 अमरावती लोकसभा शिवसेनेच्या वाट्याला असताना भाजपाच्या उमेदवार  सीमा सावळे असल्याची घोषणा पालकमंत्र्यांनी केल्याची विचारणा केली असता दानवे म्हणाले, भाजपचा उमेदवार निश्चित झालेला नाही. केंद्रीय पार्लमेंट्री समिती उमेदवार निश्चित करते. राममंदीराचा मुद्दा शिवसेनेने हायजॅक केला काय, अशी विचारणा केली असता, याविषयी शिवसेनेचे आम्ही स्वागतच करतो. राफेलचा करार काँग्रेसच्या काळात जाला अम्ही कमी दराने केला असल्याचे दानवे म्हणाले.

Web Title: BJP & Shiv Sena will contest election with Alliance - Raosaheb Demon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.