परळमध्ये गवसला ब्रिटिशकालीन मैलाचा दगड
By admin | Published: April 7, 2017 07:39 PM2017-04-07T19:39:25+5:302017-04-07T19:39:25+5:30
पदपथ व रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्याची जोरदार मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे. या कारवाईत मात्र पालिकेच्या कर्मचाऱ्यांना मैलाचा दगड गवसला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 07 - पदपथ व रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्याची जोरदार मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे. या कारवाईत मात्र पालिकेच्या कर्मचाऱ्यांना मैलाचा दगड गवसला आहे. परळ येथील केईएम रुग्णालयामागे एस.एस. राव मार्गावरील पदपथांवर कारवाईदरम्यान ब्रिटिश काळातील या दगडाचा आज सकाळी शोध लागला आहे.
बेकायदा बांधकामाला अभय दिल्याप्रकरणी एन विभागाचे सहायक आयुक्तांना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे सर्व सहायक आयुक्तांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे मुंबईत सर्वत्र रस्त्यावरील अतिक्रमण, फेरीवाले, बेकायदा बांधकामांविरोधात जोरदार कारवाई सुरु आहे. अशीच कारवाई आज सकाळी परळ विभागात सुरु असताना पालिकेच्या कामगारांना मैलाचा दगड सापडला.
त्यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना सुचित केले. या दगडावर रोमन अंकात पाच लिहण्यात आले आहे. तसेच माईल्स असे लिहले आहे. दोन ठिकाणांमधील अंतर दर्शवण्यासाठी रस्त्याच्या कडेला बसवलेला दगड म्हणजे मैलाचा दगड असे म्हणतात. ब्रिटिश काळात असे दहाहून अधिक मैलाचे दगड कुलाबा ते दादर या शहर भागात बसवण्यात आले होते.
- ब्रिटिश काळातील हे दगड कालांतराने जमिनीखाली गाडले गेले. अतिक्रमणावर कारवाई सुरु असतानना अनेकवेळा अशा दगडांचा शोध लागला आहे. असे सात ते आठ दगड असतील ज्यावर आता दुकानं उभी राहिली आहेत.