महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 10:12 AM2024-05-06T10:12:39+5:302024-05-06T10:13:05+5:30

भाजपसह महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करून त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

cancel the candidature of the maha yuti candidates; Complaint of violation of code of conduct by Congress to Election Commission | महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार

महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पहिल्या दोन टप्प्यांत झालेले मतदान आपल्या विरोधात झाल्याचा अंदाज आल्याने भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आता धार्मिक अजेंडा आणि पाकिस्तानला निवडणूक प्रचारात घेऊन आले आहेत. भाजपने रविवारी दिलेली जाहिरात त्यांच्या ध्रुवीकरणाच्या अजेंड्याचे प्रतीक आहे. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेऊन भाजपसह महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करून त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्याच्या अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन भाजपने वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातीविरोधात तक्रार केली. लोंढे म्हणाले, पहिल्या दोन टप्प्यात झालेले मतदान आपल्या विरोधात झाले आहे याची जाणीव झाल्याने नरेंद्र मोदी आता धार्मिक अजेंडा आणि पाकिस्तानला निवडणूक प्रचारात घेऊन आले आहेत. तुमच्या मताने कुठे जल्लोष व्हायला हवा आहे, भारतात की पाकिस्तानात, अशी जाहिरात भाजपने दिली आहे.

भाजपला भारत आणि पाकिस्तानमधला फरक कळत नाही का? असा सवाल करून पंतप्रधान हतबल, निराश आणि वैफल्यग्रस्त झाल्याची टीका लोंढे यांनी केली.

Web Title: cancel the candidature of the maha yuti candidates; Complaint of violation of code of conduct by Congress to Election Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.