सेंन्सरद्वारे वारीतील गर्दीचे होणार आकलन
By admin | Published: June 28, 2016 09:13 PM2016-06-28T21:13:27+5:302016-06-28T21:13:27+5:30
पालखी सोहळ्यात सहभागी होणारे वारकरी, दर्शनासाठी येणारे हजारो भाविक यामुळे पालखी स्थळाच्या ठिकाणी एकाचवेळी किती गर्दी आहे, याची काहीही माहिती पोलिसांना मिळत नाही़ सीसीटीव्हीवरुन
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २८ - पालखी सोहळ्यात सहभागी होणारे वारकरी, दर्शनासाठी येणारे हजारो भाविक यामुळे पालखी स्थळाच्या ठिकाणी एकाचवेळी किती गर्दी आहे, याची काहीही माहिती पोलिसांना मिळत नाही़ सीसीटीव्हीवरुन काही अंतरापर्यंतचे दृश्य दिसू शकते़. पण, त्याच्या आजूबाजूला नेमके किती लोक आहेत़ दर्शन घेण्यासाठी येणारे आणि दर्शन घेऊन परत जाणारे त्यांची एकत्रित माहिती उपलब्ध होऊ शकत नाही़. पालखी मुक्काम व त्याच्या परिसरात एकाचवेळी किती लोक आहेत, त्यात मिनिटागणीक किती वाढ होते किंवा घट होते, याची माहिती यंदा पोलिसांना मिळणार आहे तिही सेंन्सरच्या सहाय्याने़ या प्रयोगाविषयी पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, दीपक साकोरे यांनी माहिती दिली़ पुणे पोलीस आणि ब्ल्युरेडिएंझ यांच्या वतीने नाना पेठ, रामोशी गेट, पालखी विठोबा चौक, निवडुंगा विठोबा मंदिर, पुलगेट या पाच ठिकाणी सेंन्सर बसविण्यात आले आहे़. पुण्यात पालखी चौक आणि निवडुंगा विठोबा मंदिर येथे पालख्यांचा मुक्काम असतो़. विश्रांतीच्या दिवशी पालख्याच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात़ गर्दी असते, असेच सांगितले जाते़. पण, त्यांची नेमकी संख्या किती असते़ याविषयी आजवर कोणतीही नोंद ठेवण्यात आलेली नाही़ ऐनवेळी गर्दी वाढली. तर त्याची तातडीने माहिती मिळून कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी उपाय योजना कशी करता येईल, या विचाराने रियल टाईम क्राऊड मेजरमेंट ही पद्धत वापरण्याचा प्रयोग यंदा प्रायोगिक तत्वावर करण्यात येणार आहे़.
याबाबत ब्ल्यु रानदाईजचे मकरंद हरदास यांनी सांगितले, की दोन्ही पालख्यांच्या दर्शनासाठी येणाऱ्या पाच ठिकाणी आपण सेंन्सर बसविण्यात आले आहे़ आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल असतो़. या सेंन्सरच्या ४०० ते ५०० चौरस मीटर परिसरात कोणीही मोबाईल घेऊन आला की, सेंन्सर त्याची नोंद घेईल व त्या ठिकाणी त्यावेळेला किती लोकांची गर्दी आहे, याची माहिती मुख्य निरीक्षण केंद्राला तातडीने स्किनवर दिसेल़ त्या परिसरातून निघून गेल्यावर त्याची संख्या कमी होईल़ त्यामुळे एका ठिकाणी मर्यादेपेक्षा अधिक लोकांची गर्दी होत आहे, असे दिसत असल्यास पोलीस तातडीने उपाययोजना करुन तेथे काही होणार नाही, याची दक्षता घेऊ शकतील़ ज्यांच्याकडे मोबाईल नाही, यांची गणती यामध्ये होणार नाही़ या सेंन्सरमुळे पालखीच्या परिसरात एकावेळी लोकांची नेमकी संख्या किती आहे, याची माहिती पोलिसांना मिळू शकणार आहे़.