चंद्रभागेला आला भक्तीचा महापूर!

By admin | Published: July 27, 2015 01:05 AM2015-07-27T01:05:57+5:302015-07-27T01:05:57+5:30

सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी गेले काही दिवस संत-सज्जनांच्या पालख्यांसोबत चाललेले वारकरी पंढरीत आल्यानंतर चंद्रभागेच्या तिरी भक्तीचा

Chandrabhaga is a great devotion! | चंद्रभागेला आला भक्तीचा महापूर!

चंद्रभागेला आला भक्तीचा महापूर!

Next

बाळासाहेब बोचरे, पंढरपूर
धन्य धन्य पांडुरंग
सकळ दोष होय भंग
पूर्वज उद्धरी सांग
पंढरपूर देखलिया
सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी गेले काही दिवस संत-सज्जनांच्या पालख्यांसोबत चाललेले वारकरी पंढरीत आल्यानंतर चंद्रभागेच्या तिरी भक्तीचा महापूर आला. अवघी पंढरी विठुनामाच्या गजराने दुमदुमली.
सुमारे ११ लाख भाविकांची मांदियाळी पंढरीत दाखल झाली. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसोबत सर्वाधिक साडेतीन लाख वारकरी आहेत. संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत तीन लाख, संत सोपानकाका, संत निवृत्तीनाथ, संत एकनाथ यांच्यासमवेत मिळून सुमारे एक लाख भाविक आहेत.
संत मुक्ताबाई, संत गजानन महाराज, संत दामाजीपंत, श्री चांगावरेश्वर, संत जगनाडे महाराज, चौरंगीनाथ बाबा, संत गोरोबाकाका आदी पालख्याही येथे दाखल झाल्या आहेत. वाखरीतून निघालेल्या संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम, संत सोपानकाका, संत एकनाथ आणि संत निवृत्तीनाथांच्या पालख्यांच्या स्वागतासाठी संत मुक्ताबाई, संत नामदेव यांच्या पालख्या पंढरपुरात विसाव्यापर्यंत आल्या. माऊलींतर्फे मुक्ताबाईला साडी-चोळी तर मुक्ताबार्इंतर्फे माऊलींना उपरणे देऊन भावनिक नाते जपण्यात आले. येथे माऊली व संत तुकाराम महाराज पालखीचे उभे रिंगण झाले.

Web Title: Chandrabhaga is a great devotion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.