अमोल कोल्हेंच्या विरोधात शिरुरमधून लढण्याची ऑफर होती का? छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 11:26 AM2024-04-25T11:26:23+5:302024-04-25T11:27:48+5:30

Chhagan Bhujbal on Amol Kolhe Shirur Lok Sabha Election 2024: मुख्यमंत्री शिंदेंनी भुजबळांना शिरुरमधून लढायचा पर्याय सुचवला होता, पण भुजबळांनी नकार दिला, असा दावा अमोल कोल्हे यांनी केला. त्यावर भुजबळांनी उत्तर दिले.

Chhagan Bhujbal reaction on Amol Kolhe claiming about Mahayuti candidature in Shirur Lok Sabha Election 2024 | अमोल कोल्हेंच्या विरोधात शिरुरमधून लढण्याची ऑफर होती का? छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं

अमोल कोल्हेंच्या विरोधात शिरुरमधून लढण्याची ऑफर होती का? छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं

Chhagan Bhujbal on Amol Kolhe Shirur Lok Sabha Election 2024: सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. याच दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी एक दावा केला. शिरुर लोकसभेत माझ्या विरोधात छगन भुजबळ यांना (Chhagan Bhujbal) उमेदवारी दिली जाणार होती. मात्र, भुजबळांनी शिरुरमधून लढण्यास नकार दिला. त्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटलांना उमेदवारी देण्यात आली, असा दावा कोल्हे यांनी केला. त्यांच्या या दाव्यावर आता छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

छगन भुजबळ म्हणाले, "माझ्या तोंडात चुकीचे शब्द घालू नका. मी कशाला तिकडे जाईन. मी त्यांना दोष देत नाही. भुजबळ हे नाव नाशिकमध्ये फायनल झालं होतं. मी सगळं सांगितले होते. दिल्लीत ठरलंही होतं. पण मुख्यमंत्री शिंदे यांना अडचण होती, त्यामुळे त्यांनी मला चांगुलपणा म्हणून मध्ये विचारलं की, शिरुरमध्ये ओबीसी आणि माळी समाज जास्त आहे, तुम्ही तिथून लढता का? त्यांचा हेतू हा होता की मी तिकडे गेलो तर नाशिकचा तिढा सुटेल. एक चांगला हेतू होता. ते प्रयत्न करणार होते. पण मी सांगितलं की ओबीसी समाज महाराष्ट्रभर आहे. माझा संबंध नाशिकशी आहे, मी पालकमंत्री आमदार नाशिकचा आहे. त्यामुळे मी काहीही मागितलं नाही."

"नाशिक सोडून मला पाहिजे म्हणून मी कुठेही उभा राहणार ही माझी वृत्ती नाही. त्यामुळे शिरूरला लढण्याचा प्रश्नच येत नाही. पार्टीने सांगितले म्हणून मी नाशिकला तयार झालो होतो. मला तशी अनेक ठिकाणी मागणी होती, सभा जिथे जिथे झाल्या तिथून मागणी होती. पण नाशिक ठरलं. नाशिक मिळालं तर ठीक नाहीतर काम सुरू आहे," असेही भुजबळ यांनी स्पष्टपणे सांगितले.

महायुतीतील नाशिकचा तिढा कधी सुटणार हा प्रश्न आता तुम्ही निर्णय प्रक्रियेतील लोकांना विचारायला हवा. कारण हा तिढा कधीपर्यंत सुटणार हे मला माहित असते, तर मी उमेदवारी मागे घेतली नसती, असेही ते म्हणाले.

"नाशिकमध्ये भुजबळांना उमेदवारी मिळाली असती तर ते निवडून आले असते हे वडेट्टीवार म्हणत असतील तर मी त्यांचा आभारी आहे. एवढं खरं आहे मला उमेदवारी दिली असती तर मी निवडून आलो असतो. ब्राम्हण समाज आणि नाशिकचे उद्योजक आले होते. प्रत्येक जण येतो आणि सांगतोय की वातावरण चांगलं आहे. निवडून आलो असतो पण जर तर ला अर्थ नाही. वडेट्टीवारांनी दाखवलेल्या विश्वासाबाबत आभार. प्रत्येक पक्षाच्या अडचणी असतात. ते विरोधी पक्ष नेते आहेत. कधी प्रेम व्यक्त करत असतात, तर काही जण खरं प्रेम व्यक्त करतात आणि काही जण पुतना मावशीचे प्रेम व्यक्त करतात. पण मी वडेट्टीवारांचे आभार मानतो," असे भुजबळ यांनी सांगितले.

भुजबळ कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी मिळणार अशी चर्चा आहे हे खरे आहे. कारण देविदास पिंगळे माझे कुटुंब आहे, रवींद्र पगार माझे कुटुंब आहे, असा उत्तर त्यांनी दिले.

Web Title: Chhagan Bhujbal reaction on Amol Kolhe claiming about Mahayuti candidature in Shirur Lok Sabha Election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.