आमिरसारख्या 1 लाख 20 हजार विहिरी मुख्यमंत्री का दाखवू शकत नाहीत, राज ठाकरेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 03:37 PM2018-08-14T15:37:27+5:302018-08-14T15:48:07+5:30
आमीरसारख्या 1 लाख 20 हजार विहिरी मुख्यमंत्री का दाखवू शकत नाहीत, आमीर खाननं लोकसहभागातून 1 लाख 20 हजार विहिरी बांधल्या तर मग तुमचे अधिकारी काय करतात, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.
ठाणे- आमिरसारख्या 1 लाख 20 हजार विहिरी मुख्यमंत्री का दाखवू शकत नाहीत, आमिर खाननं लोकसहभागातून 1 लाख 20 हजार विहिरी बांधल्या तर मग तुमचे अधिकारी काय करतात, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. ते ठाण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. आमीर खानने पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून चांगली कामे केली आहेत हे मला अशोक चव्हाण बोलले. जर लोकसहभागातून कामं होणार असतील तर मग सरकार काय करतंय. सरकारी अधिकारी आमिर खानसाठी काम करतायेत का ?, मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अपयश आमीर खानच्या आड लपवू नये, अशी टीकाही राज ठाकरेंनी केली आहे.
तसेच अजित पवारांनी केलेल्या टीकेलाही राज ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. मी अजित पवारांना उद्देशून बोललो नाही. मी 1960 पासूनच बोलत होतो. अजित पवारांनी फार मनाला लावून घेऊ नये. भ्रष्टाचार आणि राजकीय इच्छाशक्ती नसल्याने कामे होत नाहीये. सरकारमध्ये होते आणि जे सरकारमध्ये आहेत यांनी आपला पराभव मान्य करावा. जर संस्था कामं करत असतील तर करदात्यांनी कर का भरायचा, पंडित नेहरू, यशवंतराव चव्हाण यांच्या काळात मंत्र्यांनी कामं केलीच आहेत.
राज ठाकरे, तुम्ही बरोब्बर बोललात पण...
...जेवढं पाणी मुरलं तेवढ्यात दुष्काळ संपला असता - राज ठाकरे
हगणदारीमुक्त महाराष्ट्र, 1 लाख 20 हजार विहिरी बांधल्या, थापा मारायच्या तरी किती, अनेक जुन्या विहिरी पेपरमध्ये दाखवल्या जातायेत. पाणी हा विषय राज्यातला सर्वात महत्त्वाचा विषय आहे. हाणामा-या करणं आणि तोडफोड करणं हे काय पक्षाचे काम नाही. पण निवेदन देऊनही काम होत नसतील तर मग काय करायचे, अत्यंत प्रामाणिक पोलीस आयुक्त मिळाल्याने ठाण्याचे आता भलं होणार आहे, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.
काहीजण बोलघेवड्या सारखं बोलतात; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला
पाण्यासाठी सगळ्यांचा एकच पक्ष - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आमीरसारख्या 1 लाख 20 हजार विहिरी मुख्यमंत्री का दाखवू शकत नाहीत, आमीर खाननं लोकसहभागातून 1 लाख 20 हजार विहिरी बांधल्या तर मग तुमचे अधिकारी काय करतात, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.