जिल्हाधिकारी कार्यालय ‘डिजिटल चॅम्पियन’
By admin | Published: February 28, 2017 03:23 AM2017-02-28T03:23:36+5:302017-02-28T03:23:36+5:30
ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना डिजिटल इंडिया कार्यक्र मांतर्गत डिजिटल चॅम्पियनशिपचे उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले
ठाणे : माहिती तंत्रज्ञानाचा परिणामकारक वापर करून जनतेला शासकीय सेवा दिल्याबद्दल ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना डिजिटल इंडिया कार्यक्र मांतर्गत डिजिटल चॅम्पियनशिपचे उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले आहे. हरियाणा येथील कार्यक्र मात मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. देण्यात आले. राज्यातून केवळ ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाची निवड झाली आहे.
प्रथम क्रमांक पाटणा, द्वितीय क्रमांक इंदूर, तृतीय क्र मांक गांधीनगर जिल्ह्याला मिळाला आहे. केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया कार्यक्र मात डिजिटल इंडिया फाउंडेशनच्या सहकार्याने इन्फॉर्मेशन, कम्युनिकेशन अॅण्ड टेक्नॉलॉजीचा वापर शासकीय सेवा पुरवताना करणाऱ्या देशभरातील जिल्हाधिकाऱ्यांना दरवर्षी हा अॅवार्ड दिला जातो. यानुसार, या वर्षीच्या पुरस्कारासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाची निवड झाली असता उत्तेजनार्थ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
देशात ठाणे चौथ्या क्र मांकावर आहे. देशातील ६० जिल्हाधिकाऱ्यांनी जी टू सी (गव्हर्नमेंट ते सिटीझन) या स्पर्धेत सहभाग घेतला होता. यात ठाणे जिल्ह्याचा चौथा क्रमांक आहे. सहज मोबाइलअॅप, वर्कस्टेशन्स ठाणे प्रवाह, डिजिटल लॉकर्स, डिजिटल रेकॉर्ड रूम, डिजी-धन: कॅशलेस इनिशिएटिव्ह, आदी कामांसाठी हा अॅवार्ड मिळाला. (प्रतिनिधी)
>60 जिल्हाधिकाऱ्यांनी जी टू सी (गव्हर्नमेंट ते सिटीझन) सेवांबाबतच्या स्पर्धेत सहभाग घेतला होता. यामध्ये ठाणे जिल्ह्याचा चौथा क्रमांक आला आहे. ठाणे सहज मोबाइलअॅप, वर्कस्टेशन्स ठाणे प्रवाह, डिजिटल लॉकर्स, डिजिटल रेकॉर्ड रूम, डिजी-धन: कॅशलेस इनिशिएटिव्ह, आपले सरकार पोर्टल व सोशल मीडियाचा वापर यासाठी हा पुरस्कार मिळाला आहे.