कर्नाटकात पुन्हा काँग्रेसची सत्ता येणार : मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांचा विश्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 03:32 PM2017-08-14T15:32:51+5:302017-08-14T15:37:32+5:30
आळंद दि १४ : कर्नाटकातील जनता अन्न पाणी विद्या व शेतकºयांंची सहकार खात्याची कर्जमाफी तसेच अल्पसंख्याक व अनुसूचित जाती जमातींच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्यामुळे व सर्व जाती धर्माच्या जनतेला एकत्रित घेऊन जात असल्यामुळे हात देणार नाही़
आॅनलाइन लोकमत सोलापूर
आळंद दि १४ : कर्नाटकातील जनता अन्न पाणी विद्या व शेतकºयांंची सहकार खात्याची कर्जमाफी तसेच अल्पसंख्याक व अनुसूचित जाती जमातींच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्यामुळे व सर्व जाती धर्माच्या जनतेला एकत्रित घेऊन जात असल्यामुळे हात देणार नाही़ त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कर्नाटकात पुन्हा एकदा कॉंग्रेसचेच सरकार येणार आहे असा आत्मविश्वास मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आळंद येथे बोलताना व्यक्त केला.
कलबुरगी जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित केलेल्या मिनी विधानसौध बांधकामाचे भूमिपूजन व विविध विकास कामांचे कोनशिला अनावरण समारंभात ते बोलत होते़ पालकमंत्री डॉ.शरणप्रकाश पाटील यांनी हैदराबाद कर्नाटक विकास महामंडळाच्या कामाचा संक्षिप्त आढावा घेतला. स्वागत व प्रास्ताविकात आमदार बी.आर.पाटील यांनी केले़ शेतकºयांच्या कर्जमाफीबध्दल मुख्यमंत्र्यांचा हिरवी शाल व नांगर देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास औशाचे आ़ बसवराज पाटील, आ़ सिध्दाराम म्हेत्रे, माजी मंत्री बाबुराव चिंचनसूर, ईशान्य कर्नाटक परीवहन मंडळाचे अध्यक्ष इलियास बागवान, आमदार जी.रामकृष्ण, जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष भागनगौड संकनूर,
----------------
भुकमुक्त कर्नाटक म्हणून कर्नाटकची ओळख़़.....
राज्यातील १.८ लाख कुटुंबातील ४ लाख जनतेला मोफत तांदूळ देत असल्यामुळे कर्नाटक भूकमुक्त राज्य बनले आहे तसेच दुधउत्पादकांना लिटरला प्रतिलिटर ५ रु.अनुदान, अनुसूचित जाती जमातींच्या विकासासाठी २७ हजार कोटी रुपये खर्चाची तरतूद व पाटबंधारे विभागावर ६० हजार कोटी रुपये खर्च केले जे मागच्या भाजप सरकारने १८ हजार कोटी खर्च केले होते असा विकासाचा चढता आलेख पहाता जनता आम्हाला कशी दूर करेल. आम्ही सर्व जाती धर्माच्या जनतेला एकत्रित घेऊन जात आहोत पण भाजप समाज फोडण्याचे व परस्पर जातीत विद्वेष निर्माण करण्याचे काम करत असल्यामुळे येडीयूरप्पांच्या मिशन १५० व अमित शहा यांच्या प्रस्तावित स्टॅट्रीजीचा फज्जा उडेल असे सिध्दरामय्यांनी स्पष्ट केले़