मलेशिया करणार सहकार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:32 AM2017-07-18T00:32:20+5:302017-07-18T00:32:20+5:30
नागपूर- मुंबई द्रुतगती समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पात सहभागी होण्याची तयारी मलेशिया सरकारने दाखविली, असे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नागपूर- मुंबई द्रुतगती समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पात सहभागी होण्याची तयारी मलेशिया सरकारने दाखविली, असे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सोमवारी मंत्रालयात सार्वजनिक बांधकाममंत्री शिंदे यांची मलेशियाच्या एका शिष्टमंडळाने भेट घेतली. या वेळी महाराष्ट्र राज्य रस्तेविकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी समृद्धी महामार्गाची माहिती दिली. समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पात काम करण्याची मलेशियाने तयारी दाखविली, ही आनंदाची गोष्ट आहे. अन्य रस्त्यांच्या प्रकल्पातदेखील सोबत काम करू, असेही त्यांनी सांगितले. समृद्धीचे सादरीकरण पाहून प्रभावित झाल्याचे मलेशियाच्या बांधकाम मंत्रालयाचे सचिव झोहारी हाजी अकोब यांनी सांगितले. या बैठकीला मलेशियाच्या बांधकाम मंत्रालयाचे विशेष अधिकारी मसून अहमद, बांधकाम विभागाचे उपसचिव अझमान इब्राहिम, बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, सचिव अजित सगणे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.