नगराध्यक्षांच्या घराबाहेर तिरडीचा उतारा ठेवणा-यावर अंधश्रध्दा निर्मूलन कायद्यांतर्गंत गुन्हा
By admin | Published: April 19, 2017 05:45 PM2017-04-19T17:45:56+5:302017-04-19T18:01:19+5:30
लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या घराच्या बाहेर दरवाज्यात शनिवारी रात्री 1:46 वाजण्याच्या सुमारास काळ्या बाहुलीची बांधलेला तिरडी उतारा
Next
>ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 19 - लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या घराच्या बाहेर दरवाज्यात शनिवारी रात्री 1:46 वाजण्याच्या सुमारास काळ्या बाहुलीची बांधलेला तिरडी उतारा व मृत्यूयंत्र असलेला कागद ठेवत अंधश्रध्दा पसरविणारा भोंदूबाबा संतोष पिंजण (रा. गावडे चाळ, भांगरवाडी लोणावळा) याला लोणावळा शहर पोलीसांनी मंगळवारी रात्री अटक केली. त्याच्यावर महाराष्ट्र नरबंदी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध व समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 चे कलम 2 (1) 8 अन्वेय गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षा नंदिनी जाधव, राज्य कार्यवाह मिलिंद देशमुख, विवेक सांबरे, पांडूरंग तिखे, शशिकांत शिंदे, सच्चिदानंद बलराज, राजाराम साबळे यांनी लोणावळा शहर पोलीसांना लेखी निवेदन देत अंधश्रध्देला खतपाणी घालण्याचा प्रकार करणार्या भोदूंबाबाच्या विरोधात कडक करवाई करण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्रात अंधश्रध्दां निर्मूलनाचा कायदा झाला तरी बुवाबाजी करणारे काही थोतांड मंडळी अंगारे, धुपारे करुन नागरिकांच्या मनात भिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना योग्य शासन करा अशी मागणी नंदिनी जाधव यांनी केली.