स्त्रियांचे पौरोहित्य हा क्रांतिकारक निर्णय : जोशी
By admin | Published: August 30, 2014 11:18 PM2014-08-30T23:18:04+5:302014-08-30T23:18:04+5:30
आम्ही ज्या काळात पौरोहित्य सुरू केले त्या काळात ते जवळजवळ निषिद्धच होते. त्यामुळे स्त्रियांना पौरोहित्य शिकवण्याचा निर्णय ख:या अर्थाने क्रांतिकारक होता, असे महिला पुरोहित मालती जोशी यांनी सांगितले.
Next
पुणो : आम्ही ज्या काळात पौरोहित्य सुरू केले त्या काळात ते जवळजवळ निषिद्धच होते. त्यामुळे स्त्रियांना पौरोहित्य शिकवण्याचा निर्णय ख:या अर्थाने क्रांतिकारक होता, असे महिला पुरोहित मालती जोशी यांनी सांगितले. ‘ती’चा गणपती’ या ‘लोकमत सखी गणोश मंडळा’च्या उपक्रमात गणोश प्रतिष्ठापनेचे पौरोहित्य त्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्यांनी आपले अनुभव सांगितले. मालती जोशी यांनी वयाची 86 वर्षे पूर्ण केली आहेत. मात्र, अजूनही त्या त्याच तन्मयतेने पूजा सांगतात. कसलीही तडजोड नाही किंवा शॉर्टकट नाही. त्या महिला पुरोहितांच्या पहिल्या फळीतील आहेत. ‘उद्यान प्रासाद’चे माजी संचालक शंकर हरी थत्ते यांचे ऋण त्या मानतात. थत्ते यांच्या मनात सर्वात प्रथम महिलांना पौरोहित्य शिकवावे, असे आले. वृत्तपत्रत जाहिरात देऊन त्यांनी इच्छुक महिलांची निवड केली. ही गोष्ट 74-75 सालची. त्यामुळे याचे सगळे श्रेय त्या थत्तेंना देतात. मालतीबाई तेव्हा 47 वर्षाच्या होत्या. पाठांतराची आवड असल्याने त्यांनी पौरोहित्य शिकायचे ठरवले. आपल्या कुटुंबीयांनी विशेषत: पतीने आपल्याला खूप पाठिंबा दिल्याचे ते सांगतात. पौरोहित्य करताकरता त्यांनी इतर स्त्रियांना प्रशिक्षण देणोही सुरू केले. स्त्रीचा आवाज हा नस्ैार्गिकरीत्याच बारीक आणि स्पष्ट असल्याने तिने म्हटलेले मंत्र अधिक स्पष्टपणो ऐकू येतात. त्यामुळेच असेल, पण महिला पौरोहित्यांना खूप मागणी आहे. एकदा एखाद्या घरी जाऊन आलो की ते पुन्हा बोलवतातच, हा अनुभव त्या सांगतात. मालतीबाई वास्तुशांतीपासून सत्यनारायणार्पयत सगळ्या पूजा सांगतात. अजूनही मंत्रंचा सराव करतात. आज काळ बदलला आहे, असे आपण म्हणत असलो, तरी पौरोहित्याची आवड कायम आहे, असा त्यांचा अनुभव आहे. त्यांच्याकडे सुमारे 15क् जणी शिकण्यासाठी इच्छुक आहेत, यावरून हेच स्पष्ट होते.
महिलांच्या अभिव्यक्तीचे मुक्त व्यासपीठ असणा:या ‘लोकमत सखी मंचा’च्या पुढाकाराने ‘ती’चा गणपतीची सुरूवात होत आहे. ‘लोकमत सखी मंच’ ही एक चळवळ आहे. स्त्रीशिक्षणाची मुहूर्तंमेढ ज्या पुण्यात रोवली तेथूनच हा उपक्रम सुरू होत आहे. हे अभिनव पाऊल ही एक चळवळ आहे.
- चित्र गावडे-सरसे, अध्यक्षा, लोकमत सखी गणोश मंडळ
‘तिचा गणपती’ हा लोकमत समूहाचा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. गणपती ही विद्येची आणि कलेची देवता आहे.महिलांना इतर सर्व पूजांचा मान असला तरी सार्वजनिक स्वरूपात गणोशोत्सव साजरा केला जात नव्हता. ‘लोकमत’ने या उपक्रमाच्या माध्यमातून स्त्रीशक्तीला मुख्य प्रवाहाशी जोडण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
- मोहन दाते, दाते पंचागकर्ते