चंपाषष्ठी निमित्त येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषाने दुमदुमली सोन्याची जेजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 06:54 PM2019-12-02T18:54:49+5:302019-12-02T19:09:28+5:30

चंपाषष्ठी निमित्त जेजुरी गडावर भाविकांची अलोट गर्दी

An crowed of devotees at Jejuri for Champashshti utsav | चंपाषष्ठी निमित्त येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषाने दुमदुमली सोन्याची जेजुरी

चंपाषष्ठी निमित्त येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषाने दुमदुमली सोन्याची जेजुरी

googlenewsNext
ठळक मुद्देदेवाला वांगे भरीताचा नैवेद्य दाखवून उत्सवाचा सोडण्यात आला उपवास


जेजुरी: तीर्थक्षेत्र जेजुरी गडावर चंपाषष्टीचे औचित्य साधून सुमारे एक लाखांवर भाविकांनी दर्शन घेतले. सदांनंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार च्या गजरात भंडारा खोबºयाच्या उधळणीत भाविकांनी रांगा लावून कुलदैवताचे दर्शन घेतले. गडावर आणि शहरात सर्वत्र कुलधर्म कुळाचाराचे धार्मिक कार्यक्रम तसेच देवाचा जयघोष ऐकू येत होता. भंडार खोबऱ्याच्या मुक्तहस्ताने करण्यात आलेल्या उधळणीमुळे संपूर्ण गडकोट आणि प्रमुख रस्ते पिवळ्या जर्द भंडाऱ्याने माखल्यामुळे सोन्याच्या जेजुरीचा भास होत होता.


सोमवारी (दि.२) सकाळी देवाची महापूजा, महाभिषेकानंतर बालदारीतील घट उठवण्यात आले. त्यानंतर घराघरातील ही घट उठले. देवाला वांगे भरीताचा नैवेद्य दाखवून उत्सवाचा उपवास सोडण्यात आला.  दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या कालावधीत जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सव साजरा होतो. प्रतिपदेपासून मार्तंड भैरवाने दानवांशी युद्ध सुरू केले ते सहा दिवस चालले.षष्ठीला देवाने दानवांवर विजय मिळवला. ऋषी मुनींनी चाफ्याच्या फुलांनी देवाची पूजा करून विजय दिवस साजरा केला, अशी आख्यायिका असून तेव्हापासून हा उत्सव साजरा होत आहे. या सहा दिवसांत राज्यातून लाखो भाविक जेजुरी गडावर येवून देवदर्शन घेत असतात.

स. पो.नि. अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी पोलिसांनी वाहतुकीबरोबरच बंदोबस्त चोख ठेवला होता. मार्तंड देवसंस्थानचे सर्व विश्वस्त त्याचबरोबर देवाचे मुख्य पुजारी व जय मल्हार चंपाषष्ठी अन्नछत्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष गडकोटावर जातीने हजर राहुन भाविकांच्या सोयी सुविधांवर लक्ष ठेवून होते.भाविकाकडून देवदर्शनाबरोबरच कुलधर्म कुळाचाराचे धार्मिक विधी उरकण्यात येत होते.

Web Title: An crowed of devotees at Jejuri for Champashshti utsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.