मुंबईतील शाळांना १६ कोटींचे वेतनेतर अनुदान वितरीत
By admin | Published: May 9, 2014 09:13 PM2014-05-09T21:13:27+5:302014-05-09T22:47:05+5:30
मुंबईतील शाळांचे २00४ पासून थकित असलेले वेतनेतर अनुदान शिक्षण विभागाने वितरीत केले आहे.
मुंबईतील शाळांना १६ कोटींचे वेतनेतर अनुदान वितरीत
मुंबई : मुंबईतील शाळांचे २00४ पासून थकित असलेले वेतनेतर अनुदान शिक्षण विभागाने वितरीत केले आहे. १६ कोटींचे अनुदान मिळाल्याने शाळा व्यवस्थापनाच्या अनेक अडचणी दूर होणार आहेत.
शाळांना वेतनेतर अनुदान तात्काळ मिळावे, यासाठी शिक्षण हक्क कृति समितीने आंदोलन केले होते. शासनाने शाळांना ५ टक्कयांपैकी ४ टक्के वेतनेतर अनुदान वितरीत केले आहे. शाळांना वेतनेतर अनुदान वितरीत केल्याने शिक्षक भारतीने शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांना धन्यवाद दिले आहेत. दक्षिण मुंबई विभागात २९५ शाळा आणि ज्युनिअर महाविद्यालयांना ५ कोटी ४0 लाख, उत्तर मुंबई विभागातील १६२ शाळांना ३ कोटी ५८ लाख १३ हजार ५२६ आणि पिम मुंबई विभागातील ३५४ शाळा आणि महाविद्यालयांना ७ कोटी ९२ लाख ३३ हजार इतके वेतनेतर अनुदान वितरित करण्यात आले आहे. यामुळे शाळांना दिलासा मिळाला आहे, अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्यवाह सुभाष मोरे यंानी दिली.